मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आईसोबत चिमुकल्यानेही धरला ताल; प्रियंका बर्वेने शेअर केला VIDEO

आईसोबत चिमुकल्यानेही धरला ताल; प्रियंका बर्वेने शेअर केला VIDEO

प्रियंकाने नुकताच एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या एखाद्या स्टुडिओमधील रेकॉर्डिंगचा नाही, तर तिच्या मुलासोबत गातानाच आहे.

मुंबई, 21 जानेवारी : सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. प्रियंकाने नुकताच एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या एखाद्या स्टुडिओमधील रेकॉर्डिंगचा नाही, तर तिच्या मुलासोबत गातानाच आहे. सोशल मीडियावर प्रियंकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओला अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

प्रियंका बर्वेने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रियंकाने त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. परंतु तिने आता शेअर केलेला हा व्हिडीओ अतिशय खास असून प्रियंका तिच्या बाळासोबत गाताना या व्हिडीओत दिसते आहे. प्रियंका गाते, तसं तिचं बाळही त्याच्याच भाषेत काहीतरी बोलताना दिसतोय. तीने काही ओळी गायल्यानंतर, तोदेखील तिच्या मागे गुणगुण्याचा प्रयत्न करतो. 'वर्क इन प्रोग्रेस' असं कॅप्शन देत प्रियंकाने हा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे.

गायिका प्रियंका बर्वे आणि सारंग कुलकर्णी यांनी 20 ऑगस्ट रोजी आई-बाबा झाल्याची बातमी दिली. त्यानंतर अनेक दिवसांनी त्यांनी बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, प्रियंकाने आनंदी गोपाळ, रमा-माधव, पानीपत यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी आपला आवाज दिला आहे.

First published:
top videos