मुंबई 16 जुलै : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) हे बॉलिवूड (Bollywood) ते हॉलिवूड (Hollywood) सगळ्यांचच आवडत कपल बनलं आहे. सोशल मीडिया वर त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अनेक कार्यक्रमामध्ये ते एकत्र दिसतात देखील. प्रियंका आणि निक यांचं नातं नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी खास आणि तितकाच चर्चेचं राहील आहे. 2018 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली पण त्याआधी पासूनच ते एकमेकांना डेट करत होते. (Priyanka chopra –Nick Jonas)
प्रियंका आणि निकचं नात त्यांच्या वयातील अंतरामुळेही नेहमीच चर्चेत राहील आहे. पण त्यांच्यातील केमिस्ट्री नेहमीच साऱ्यांच लक्ष वेधून घेते. तर यावेळीही प्रियंका आणि निक ची ही केमिस्ट्री दिसून आली आहे.
‘तू तर रेड कार्पेटच परिधान केलंस’; अॅमी जॅक्सनचा Cannes 2021 लुक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियागेले अनेक दिवस निक हा दाढी वाढलेल्या लुक मध्ये दिसत होता. पण आता त्याने दाढी काढली आहे. तर तो क्लीन शेव्ह मध्ये दिसून येत आहे. तर निकच्या या लुक वर प्रियंका ही घायाळ झालेली पाहायला मिळत आहे.
निकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर त्याचा क्लीन शेव्ह फोटो शेअर केला आहे. ज्यावर प्रियांकाने लव्ह ईमोजी लिहीत कमेंट केली आहे.
प्रियंका सध्या तिची नवी वेब सीरिज ‘सिटाडेल’ची लंडन मध्ये शूटिंग करत आहे. तर निक अमेरिकेत त्याच्या भावांसोबत त्यांच्या प्रसिद्ध बँड (Jonas brother) चे परफॉर्मन्स सादर करत आहेत. तरिही अनेकदा ते एकत्र दिसतात. काही महीन्यांपूर्वी बिलबोर्ड म्युझिक (BMA) पुरस्कार सोहळ्यासाठी ते एकत्र दिसले होते.