Home /News /entertainment /

Ranveer Singh Birthday: कॉलेजच्या दिवसांत बटर चिकन विकून पैसे मिळवायचा अभिनेता; जाणून घ्या रणवीर सिंहच्या काही खास गोष्टी

Ranveer Singh Birthday: कॉलेजच्या दिवसांत बटर चिकन विकून पैसे मिळवायचा अभिनेता; जाणून घ्या रणवीर सिंहच्या काही खास गोष्टी

रणवीर सिंहच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच; पण त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मुंबई, 06जुलै:  बॉलीवूडमधील हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh). आज हा अतरंगी कलाकार त्याचा बर्थडे (Birthday) साजरा करत आहे. त्याचे चित्रपट, अभिनय याबरोबरच त्याच्या फॅशन, कपड्यांमुळेही तो सतत चर्चेत असतो. तसंच त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्यावरचं त्याचं प्रेम आणि ते व्यक्त करण्याची त्याची पद्धत यामुळेही त्याच्याबद्दल सतत चर्चा होतच असते. रणवीर सिंहच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच; पण त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज तकच्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. रणवीरच्या अभिनयाबद्दल तर वेगळं काही सांगायला नको. त्याला अभिनयाची पहिल्यापासूनच आवड होती. पण बॉलीवूडमध्ये जम बसवणं, नाव कमावणं इतकं सोपं नाही हे त्याला चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यानं आधी क्रिएटिव्ह रायटिंगवर लक्ष दिलं होतं. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये (Indiana University Of America) ॲडमिशन घेतलं होतं. तिथे त्यानं अ‍ॅक्टिंग क्लासेस आणि थिएटरचा (Acting Classes) अभ्यास सुरु केला होता.
हेही वाचा - Ranveer Singh Birthday : कुठंवर आलं बाळाचं प्लॅनिंग? रणवीरला होणाऱ्या मुलांसाठी काय करायचं आहे ऐका! रणवीर सिंहच्या कॉलेजच्या दिवसांमधील मजेशीर किस्से आहेत. तेव्हा रणवीरनं पार्ट टाईम नोकरीही सुरु केली होती. Vogue च्या रिपोर्टनुसार रणवीरने युनिव्हर्सिटीत शिकत असताना स्टारबक्समध्ये (Starbucks) काही काळ नोकरीही केली होती. फक्त इतकंच नाही तर एक्स्ट्रा इन्कमसाठी तो बटर चिकनही विकायचा. ऐकून धक्का बसला ना? पण खरोखरच रणवीर सिंह त्याच्या कॉलेजच्या खोलीत बटर चिकन बनवायचा आणि ते विकायचा. हे बटर चिकन रणवीर त्याच्या मित्रांना द्यायचा आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून होमवर्क पूर्ण करून घेणं किंवा अन्य कामं करून घ्यायचा असं त्यानं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. रणवीर आणि सोनम कपूर कझिन्स! रणवीरच्या आडनावाबद्दलचं सिक्रेट अनेकांना माहिती आहे. रणवीर सिंहचं (Ranveer Singh) नाव रणवीर भवनानी आहे. पण या अभिनेत्यानं आपलं आडनाव बदललं. तसंच रणवीर सिंहचं सोनम कपूरची आई सुनीता कपूर (Sonam Kapooro’s Mother Sunita Kapoor) म्हणजेच अनिल कपूरच्या बायकोच्या कुटुंबाशी नातं आहे. म्हणजेच रणवीर सिंह सोनम कपूरचा कझिन (Sonam Ranveer Cousin) आहे. सोनमच्या लग्नातही रणवीर सिंहनं खूप धमाल केली होती. त्याचे अनेक व्हिडिओजही व्हायरल झाले होते. बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या या हरहुन्नरी कलाकारावर बर्थडे निमित्त त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
First published:

Tags: Bollywood News, Ranveer singh

पुढील बातम्या