मुंबई, 22 एप्रिल : शाहरुख खान आणि काजोल या सुपरहिट जोडीनं अनेक हिट सिनेमा दिले आहेत. चाहत्यांना सुद्धा ही जोडी खूप आवडली. काजोल आणि शाहरुख फक्त रील लाइफमध्येच नाही तर रिअल लाइफमध्येही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. काही दिवसांपूर्वी काजोलनं तिच्या चाहत्यासाठी सोशल मीडियावर प्रश्नोतरांचं सेशन घेतलं होतं. ज्यात तिला अनेक चाहत्यांनी अतरंगी प्रश्न विचारले आणि विशेष म्हणजे काजोलनं या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली.
काजोलला या सेशनमध्ये एका चाहत्यानं एक असा प्रश्न विचारला ज्याची अपेक्षा कोणी केलीही नसेल. एका चाहत्यानं काजोलला विचारलं जर अजय देवगण तुझ्या लाइफमध्ये नसता तर तू शाहरुखशी लग्न केलं असतं का? यावर काजोलनं सुद्धा त्याला बिनधास्त उत्तर दिलं जे पाहिल्यावर सर्वच अवाक झाले.
Lockdown दरम्यान टायगर-दिशा राहतायत लिव्ह इनमध्ये? कृष्णा श्रॉफनं सांगितलं सत्य
सर्वांनाच माहित आहे की काजोल एक बिनधास्त आणि बोल्ड विचारांची अभिनेत्री आहे. ती कोणताही गोष्ट बिनधास्त बोलून जाते. त्यामुळे चाहत्याच्या या प्रश्नावरही तिनं मनात आलं ते बिनधास्त बोलून टाकलं. चाहत्याला उत्तर देताना ती म्हणाली, 'म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आता शाहरुखनं मला प्रपोज करायला नको का?' याशिवाय दुसऱ्या एका चाहत्यानं शाहरुखसोबतच्या तिच्या नात्याविषयी विचारलं असता तिन फ्रेंड्स फॉर लाइफ असं उत्तर दिलं.
'माझ्या पत्नीला पाहून त्यानं मास्टरबेट केलं' अभिनेत्याचं ट्वीट झालं होतं व्हायरल

शाहरुख आणि काजोल यांनी एकत्र 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'बाजीगर', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माई नेम इज खान' आणि 'दिलवाले' या सिनेमात काम केलं आहे. काजोलच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची पती अजय देवगणसोबत 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या सिनेमात दिसली होती. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
(संपादन : मेघा जेठे.)
लॉकडाऊनच्या प्रेमात आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री,शेअर केला बिकिनीतील फोटो मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.