जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD Kriti Sanon: Engineering करणारी तरुणी कशी झाली Bollywood actress?

HBD Kriti Sanon: Engineering करणारी तरुणी कशी झाली Bollywood actress?

HBD Kriti Sanon: Engineering करणारी तरुणी कशी झाली Bollywood actress?

ती इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होती. अन् त्यामध्येच तिनं करिअर करावं अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 27 जुलै**:** हिरोपंती या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली क्रिती सेनन (Kriti Sanon) आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज तिचा वाढदिवस आहे. (Happy Birthday Kriti Sanon) 31 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज क्रिती यशाच्या शिखरावर आहे. (Kriti Sanon Movie) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कधीकाळी ती इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होती. अन् त्यामध्येच तिनं करिअर करावं अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु तरी देखील ती सिनेसृष्टीत आली, अन् आज ती एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती नवी दिल्लीतील न्यू दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरम शाळेत क्रितीचे शिक्षण झाले. यानंतर क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशनमध्ये बी. टेक केले. वयाच्या पाचव्याच वर्षी क्रितीने मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्यासोबत रॅम्प वॉक केलं होतं. मॉडेलिंग करणं हा तिचा फक्त छंद होता. तिला पहिल्यापासून ओढ होती ती बॉलिवूडची. परंतु सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांनी यासाठी तिला नकार दिला. त्यामुळे मग ती प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होती. परंतु मग तिचं टॅलेंट आणि होणारं कौतुक पाहून तिला बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहण्याची संमती मिळाली. ‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती क्रितीने नेनोक्कडीने या दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने सुपरस्टार महेश बाबूसोबत काम केलं होतं. तिचा अभिनय पाहून हिरोपंती या बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली. या चित्रपटाची चर्चा झाली मात्र तिकिटबारीवर म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र त्यांनतर दिलवाले आणि राबता हे चित्रपट हिट झालं अन् तिच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. त्यानंतर ती बरेली की बर्फी, लुका छुपी, अर्जुन पटियाला हाउसफुल 4 या चित्रपटांमध्ये झळकली. शिवाय नुकताच तिचा मिमी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात