Home /News /entertainment /

‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती

‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती

फ्लोरानं एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली...

  मुंबई 26 जुलै: राज कुंद्रानं (Raj Kundra) आपल्या हॉटशॉट अ‍ॅपसाठी गंदी बात फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी (Flora Saini) हिला विचारलं होतं अशी सर्वत्र चर्चा आहे. (Raj Kundra Pornography case) तो तिच्यासोबत एक अश्लील वेब सीरिज तयार करणार होता असं म्हटलं जात आहे. परंतु या चर्चेवर आता स्वत: प्लोरानं स्पष्टीकरण दिलं. तिला अशी कुठलीही ऑफर मिळाली नव्हती. उलट राज कुंद्रासोबत तिचं यापूर्वी कधीही साधं संभाषणही झालेलं नाही असं तिने स्पष्ट केलं. फ्लोरानं एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “या प्रकरणात माझं नाव उगाचच जोडलं जात आहे. राज कुंद्रा किंवा उमेश कामत यापैकी कोणीही कधीही मला संपर्क केलेला नाही. ही दोघंही बॉलिवूडमधील मोठी नाव आहेत. अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांच्या गप्पा होत असतात. त्यावेळी कधीतरी ऑडिशनच्या निमित्ताने माझं नाव घेतलं असावं. परंतु राजच्या हॉटशॉट अ‍ॅपसाठी मी काम केलेलं नाही. कृपया या प्रकरणात मला खेचू नका.” अशी विनंती फ्लोराने या व्हिडीओच्या माध्यमातून ट्रोलर्सला केली आहे. अती घाई आली अंगाशी; प्रिया मलिकबद्दल चुकीची पोस्ट केल्यामुळे भूमी पेडणेकर ट्रोल
  View this post on Instagram

  A post shared by Flora Saini (@florasaini)

  ‘हा चित्रपट शहिदांना खरी श्रद्धांजली’; ‘Shershaah’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील भावुक Raj Kundra कसा करायचा आर्थिक व्यवहार? राज कुंद्रा या पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर थेट पैसे स्विकारत नव्हता. असं केल्यास त्याला मोठ्या प्रमाणावर कर द्यावा लागला असता. यासाठी त्याने एक जॉइंट अकाउंट सुरु केलं होतं. तो आधी पैसे लंडनमधील बँकेत पाठवायचा त्यानंतर ते पैसे इतर देशांमधील अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जायचे. अन् त्या अकाउंटमधून उर्वरीत आर्थिक व्यवहार केले जात होते. राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ही धक्कादायक माहिती क्राईम ब्रांचच्या हाती लागली.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Crime, Entertainment, Porn video, Raj kundra, Web series

  पुढील बातम्या