नवी दिल्ली, 6 मार्च: बॉलिवूडची ‘चांदणी’ अशी ओळख असलेल्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मोठ्या मुलीने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. त्यांच्या या मोठ्या मुलीचे नाव अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor )असे आहे. जान्हवीने अतिशय कमी कालावधीमध्ये बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. 2018 मध्ये बॉलिवूड डेब्यू करत पहिलाच हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक हिट चित्रपट दिले. आज ती आपला 25 वाढदिवस साजरा करत (Janhvi Kapoor B’day) आहे. आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत जान्हवीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पदार्पणातीलच चित्रपट सुपरहीट झाल्यामुळे तिला अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. वयाच्या 25व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण अभिनेत्री जान्हवी कपूर देखील तिची आई श्रीदेवी इतकीच दिसायला सुंदर आहे. अवघ्या 25 वर्षांची ही अभिनेत्री अप्लवधीतच करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण बनली आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत जान्हवीच्या नावादेखील उल्लेख आहे. गेल्या वर्षी एका बॉलिवूड वेबसाईटच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 58 कोटी इतकी आहे. चित्रपटासोबत मॉडेलिंगसह इतर गोष्टीतूनही करते लाखोची कमाई जान्हवीच्या संपत्तीचा हा आकडा गेल्या वर्षीचा आहे. यंदा तिच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी 5 कोटी फी घेते. याशिवाय ती अँडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही मोठी कमाई करते. जान्हवी केवळ कमाईच्या बाबतीत अव्वल नाही, सामाजिक कार्यातही ती अग्रसेर आहे. दिलदार अभिनेत्री चांगल्या कामासाठी अनेक सामाजिक संस्थांना मदत करते. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. जान्हवीने 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘मिली’, ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना 2’ मध्ये दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.