जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Irrfan Khan: 45 दिवस स्वतःला घेतलेलं कोंडून; इरफानच्या निधनानंतर अशी झालेली मुलाची अवस्था

Irrfan Khan: 45 दिवस स्वतःला घेतलेलं कोंडून; इरफानच्या निधनानंतर अशी झालेली मुलाची अवस्था

इरफान खान

इरफान खान

आज अभिनेत्याची 56 वी बर्थ ऍनिव्हर्सरी आहे.आज त्याचे जगभरातील चाहते त्याला आपल्या आठ्वणीनींमध्ये आठवून भावुक होत आहेत . दरम्यान अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने आपल्या वडिलांच्या निधना नंतरचा एक किस्सा शेअर केला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 जानेवारी- इरफान खान ला बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जात होतं. अभिनेत्याने फक्त बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू पसरवली होती. इरफान खानने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. परंतु अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला होता. आज अभिनेत्याची 56  वी बर्थ ऍनिव्हर्सरी आहे.आज त्याचे जगभरातील चाहते त्याला आपल्या आठ्वणीनींमध्ये आठवून भावुक होत आहेत . दरम्यान अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने आपल्या वडिलांच्या निधना नंतरचा एक किस्सा शेअर केला आहे. आजही इरफान खानचा मोठा चाहतावर्ग आहे. लोक सतत त्याच्याबाबत जाणून घेण्यासाठी आतुर असतात. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाबाबत जाणून घ्यायला लोकांना नेहमीच आपुलकी वाटते. इरफान खाननंतर त्याचा मुलगा बाबिल आपल्या वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. बाबिलने 2022 मध्ये ‘काला’ या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटात त्याने एका गायकाची भूमिका साकारली होती. इरफानप्रमाणेच बाबिलच्या अभिनयाचीसुद्धा लोक प्रशंसा करत होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. **(हे वाचा:** Bipasha Basu B’day: जॉनची एक चूक आणि बिपाशासोबत 9 वर्षांच्या नात्याचा The End; ‘ते’ ट्वीट ठरलं ब्रेकअपचं कारण ) बाबिलने आपल्या वडिलांची ही आवड पुढे नेण्याचं स्वतःला वचन दिलं होतं. त्यामुळे त्याने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्याने आपल्या पहिल्या ‘काला’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काही मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये त्याने आपल्या वडिलांच्या निधनानंतरचा एक किस्सा शेअर केला होता. बाबिलने सांगितलं होतं की, ज्यावेळी वडील इरफानचं निधन झालं ही गोष्ट ऐकून एक आठवडा त्याला सर्वकाही सुचायचं बंद झालं होतं. आपले वडील आता या जगात नाहीत ज्यावेळी त्याला या गोष्टीची जाणीव झाली त्याने तब्बल 45दिवस स्वतःला एकाच खोलीत बंद करुन घेतलं होतं. बॉलिवूड बबलसोबत बोलताना बाबिलने सांगितलं होतं की, ‘हा काळ आपल्यासाठी फार कठीण होता. त्या भावना शब्दात व्यक्त करणं कधीच शक्य होणार नाही. आपण यातून स्वतःला कसं सावरलं याबाबत बाबिल म्हणतो, ‘शूटिंगच्या निमित्ताने बाबा नेहमीच बाहेर असायचे. अनेक दिवसांनंतर ते घरी परतायचे. त्यामुळे आता मी माझ्या मनाला समज दिला की, माझे बाबा शूटिंगवर आहेत. ते परत येतील. परंतु जसजसे दिवस गेले त्यांना न पाहून मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावला हे मान्य केलं. माझे बाबा माझ्यासाठी खास मित्राप्रमाणे होते. असं बाबिल सांगतो.

News18लोकमत
News18लोकमत

बाबिल सध्या स्वतः च्या कौशल्यावर सिनेसृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. बाबिल लवकरच एका वेबसीरीजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजचं नाव ‘द रेल्वे मॅन’ असं आहे. ही सीरिज भोपाळ गॅस गळतीवर आधारित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात