मुंबई, 7 जानेवारी- बॉलिवूडमध्ये मध्ये असे अनेक जोडपे आहेत, जे कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. या जोडप्यांना प्रेक्षकांनीसुद्धा भरभरुन होतं. यामध्ये करीना कपूर-शाहिद कपूर, दीपिका पादूकोण-रणबीर सिंह, टायगर श्रॉफ-दिशा पाटनी अशा अनेक जोडप्यांचा समावेश होतो. एकमेकांसोबत काम करताना हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळालं होतं. आणि इथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. परंतु अनेकवर्षे एकमेकांना डेट केल्यांनंतर या कलाकारांनी ब्रेकअप करत सर्वांनाच धक्का दिला होता. यामध्ये बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांच्या जोडीचासुद्धा समावेश होतो. आज बिपाशा आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या आणि जॉनच्या ब्रेकअपबाबत जाणून घेऊया. अभिनेत्री बिपाशा बसू बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीने स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजाने सर्वानांच भुरळ पाडली आहे. सध्या बिपाशा पती करण सिंह ग्रोव्हर आणि लेक देवीसोबत आनंदाने आपलं आयुष्य जगत आहे. परंतु एकेकाळी बिपाशा अभिनेता जॉन अब्राहमच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्याकाळी या दोघांचं रिलेशनशिप प्रचंड चर्चेत होतं. तेव्हा जॉन आणि बिपाशाबाबत माहिती नाही असा व्यक्ती शोधणं थोडं कठीणच होतं. जॉन आणि बिपाशा तब्बल 9 वर्षे नात्यात होते, मात्र दुर्दैवाने त्यांचं हे नातं एका टप्यावर येऊन संपुष्ठात आलं. असं म्हटलं जातं की, जॉन अब्राहमच्या एका चुकीने या दोघांच्या नात्याचा शेवट झाला होता. **(हे वाचा:** Thalapathy Vijay: थलपती विजयचं पत्नीसोबत बिनसलं; लग्नाच्या 22 वर्षानंतर घेणार घटस्फोट? ) जॉन अब्राहमच्या चुकीनंतरच जॉन आणि बिपाशा विभक्त झाले होते. जॉन आणि बिपाशा एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल नऊ सोबत होते. दोघांचं नातं कोणापासून लपलेलं नव्हतं. अवॉर्ड शो असो, पार्टी किंवा डिनर डेट, जॉन आणि बिपाशा नेहमीच एकत्र दिसत असत. दोघांचं बाँडिंगही खूप चांगलं होतं. त्याकाळी दोघे एकमेकांसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. परंतु एके दिवशी अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला.एका क्षणात या दोघांचं 9 वर्षाचं नातं संपुष्ठात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमच्या एका चुकीमुळे या दोघांच्या नात्याचा वाईट शेवट झाला होता. 2014च्या नव्या वर्षाच्या त्या एका ट्विटने त्यांच्या नात्यात फूट पडली होती. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत जॉनने एक ट्विट केलं होतं, ‘‘हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन येवो… लव्ह जॉन आणि प्रिया अब्राहम’. जॉनने चुकून हे ट्विट केल्याचं म्हटलं जातं. या एका ट्विटने जॉन अब्राहमचं पितळ बिपाशा समोर उघड पडलं होतं. या ट्विटने सर्वत्र होती. बिपाशासोबत नात्यात असताना जॉनने दुसऱ्या मुलीचं ट्विटमध्ये लिहिल्याने सर्वांचं धक्का बसला होता.
या ट्विटमुळे बिपाशा बसूला जॉन आपली फसवणूक करत असल्याचं सत्य समजलं होतं. याच ट्विटमुळे जॉनची प्रिया रुंचाल ही एक एनआरआय गर्लफ्रेंड असल्याचं समोर आलं होतं. या ट्वीटमुळे जॉन आणि बिपाशाच्या नात्यात फूट पडली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले होते. या दोघानाच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांना मात्र नाराज केलं होतं.