मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD Aishwarya Rai Bachchan : यशाच्या शिखरावर असताना ऐश्वर्यानं बांधली अभिषेकसोबत लग्नगाठ; रंजक आहे Love Story

HBD Aishwarya Rai Bachchan : यशाच्या शिखरावर असताना ऐश्वर्यानं बांधली अभिषेकसोबत लग्नगाठ; रंजक आहे Love Story

ऐश्वर्या राय बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची सून कशी झाली याबद्दल आजही लोकांना कुतूहल आहे

ऐश्वर्या राय बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची सून कशी झाली याबद्दल आजही लोकांना कुतूहल आहे

ऐश्वर्या राय बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची सून कशी झाली याबद्दल आजही लोकांना कुतूहल आहे

  नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : मिस वर्ल्डचा (Miss World) किताब मिळवल्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणारी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आपलं विलक्षण सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे अगदी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली होती. काही काळातच तिनं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच तिनं अभिनेता अभिषेक बच्चन याच्याबरोबर लग्नगाठ बांधल्यानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या दोघांची प्रेमकहाणीही विलक्षण असून, बॉलिवूड (Bollywood) अर्थात बी-टाउनमधील एक लोकप्रिय जोडी म्हणून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची जोडी ओळखली जाते.

  ऐश्वर्या राय बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची सून कशी झाली याबद्दल आजही लोकांना कुतूहल आहे. आज 1 नोव्हेंबर ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस (Birthday) आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ यामागची खरी कहाणी.

  अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने OTT प्लॅटफॉर्मला केले अलविदा, काय आहे कारण?

  1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मेंगलोर इथं जन्मलेल्या ऐश्वर्याचं कुटुंब ती लहान असतानाच मुंबईत आलं. ऐश्वर्याचं शिक्षणही मुंबईतच झालं. त्यानंतर तिनं जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि 1993 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिचं पदार्पण झालं. काही काळातच अभिनेता सलमान खानबरोबर (Salaman Khan) तिचं अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली, मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoi) तिचं नाव जोडलं गेलं, पण हे नातंही लवकरच संपुष्टात आलं. या सगळ्या कठीण काळातून जात असतानाच 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' चित्रपटाच्या सेटवर अभिषेक बच्चनशी तिची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी अभिषेक बच्चनचंही करिश्मा कपूरसोबत ब्रेकअप झालं होतं.

  'ढाई अक्षर प्रेम के' चित्रपटादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये झालेली मैत्री 2006 मध्ये 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आणखी वाढली. अखेर टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गुरू' चित्रपटाच्या (Guru Film) प्रमोशनदरम्यान अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला प्रपोज केलं. अत्यंत रोमँटिक पद्धतीने बनावट अंगठी घालून अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज (Propose) केलं होतं. तिनेही त्याला होकार दिला. त्यानंतर 2007 मध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला.

  'अशा अफवांवर विश्वास ठेवू नका' म्हणत अरुंधतीने 'त्या' चर्चेला दिला पुर्णविराम

  ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून (Daughter in Law of Bachchan Family) बनली आणि तिने अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' या बंगल्यात पाऊल ठेवलं. लग्नाच्या ४ वर्षानंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्याला (Aaradhya) जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्याने आपलं सगळं लक्ष तिच्या संगोपनावर केंद्रित केलं. स्वतःचं करिअर बाजूला ठेवून तिनं मुलीला वाढवण्यावर लक्ष दिलं. त्यामुळंही ती लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली. आजही ती आणि अभिषेक आराध्याची खूप काळजी घेताना दिसतात.

  अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या जोडीचे जगाच्या कानाकोपऱ्यात चाहते आहेत. दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से अधूनमधून सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असतात. दोघेही सोशल मीडियावर आपली मुलगी आराध्यासह फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. एक छान कुटुंब म्हणून बच्चन कुटुंब प्रसिद्ध आहे. आता ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होणार आहे.

  First published:

  Tags: Aishwarya rai, Bollywood actress