मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Thalapathy Vijay: थलपती विजयचं पत्नीसोबत बिनसलं; लग्नाच्या 22 वर्षानंतर घेणार घटस्फोट?

Thalapathy Vijay: थलपती विजयचं पत्नीसोबत बिनसलं; लग्नाच्या 22 वर्षानंतर घेणार घटस्फोट?

थलपती विजय

थलपती विजय

साऊथ सुपरस्टार थलपती विजय सध्या आपल्या 'वरिसु' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याला नव्या वर्षात नव्या रुपात पडद्यावर पाहण्यासाठी फारच आतुर आहेत. सध्या विजय आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 6 जानेवारी-  साऊथ सुपरस्टार थलपती विजय सध्या आपल्या 'वरिसु' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याला नव्या वर्षात नव्या रुपात पडद्यावर पाहण्यासाठी फारच आतुर आहेत. सध्या विजय आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तो सतत विविध ठिकाणी प्रमोशन करताना दिसून येत आहे. अशातच आता विजय थलपतीच्या खाजगी आयुष्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्यावसायिक आयुष्यात धुमाकूळ घालणाऱ्या विजयच्या खाजगी आयुष्यात मात्र सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे.ही बातमी सध्या वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण.

साऊथच्या सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक अशी विजयची ओळख आहे. अभिनेत्याला चाहते थलपती विजय किंवा मास्टर विजय या नावानेही ओळखतात. विजयने आपल्या अभिनय आणि शांत स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षांपासून राज्य केलं आहे. विजयच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळत असते. देशातच नव्हे तर जगभरात विजयचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. सध्या विजयच्या 'वरिसु' चित्रपटाने त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

(हे वाचा:Riteish-Genelia: रितेशने जिनिलियाला दिलेलं पहिलं गिफ्ट माहितेय का? अभिनेत्रीने आजही ठेवलंय जपून )

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विजय आपलं खाजगी आयुष्य लाईमलाईटपासून नेहमीच दूर ठेवतो.परंतु सध्या अभिनेता आपल्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आला आहे. विजय आपली पत्नी संगीतासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे वृत्त समोर येताच विजयचे चाहते चकित झाले आहेत. कारण विजय आणि संगीताच्या लग्नाला जवळजवळ 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि लग्नाच्या इतक्या वर्षानंतर घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला आहे.

नुकतंच विजयच्या आगामी 'वरिसु' चित्रपटाचा संगीत लॉन्च सोहळा पार पडला. यामध्ये चित्रपटाच्या टीमसोबत अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये विजयची पत्नी संगीत गायब होती. याच गोष्टीच्या आधारे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर विजयच्या विकिपीडिया पेजवर अभिनेता घटस्फोट घेत असल्याचा कन्टेंट व्हायरल होत आहे.परंतु पिंकव्हीलाच्या रिपोर्ट्सनुसार विजय आणि संगीताच्या घटस्फोटाच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाहीय. या केवळ अफवा आहेत.

विजयची पती त्यांच्या मुलांसोबत अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत असल्याने तिने संगीत सोहळ्याला हजेरी लावली नसल्याचंसांगण्यात आलं आहे. त्यामुळे या केवळ अफवा असल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे. येत्या 11 जानेवारीला विजयचा 'वरिसु' रिलीज होणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Lokmat news 18, South indian actor