जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD Bhumi Pednekar : वडील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तर आई तंबाखूविरोधी कार्यकर्ती, जाणून घ्या भूमीविषयी 'या' खास गोष्टी

HBD Bhumi Pednekar : वडील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तर आई तंबाखूविरोधी कार्यकर्ती, जाणून घ्या भूमीविषयी 'या' खास गोष्टी

HBD Bhumi Pednekar : वडील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तर आई तंबाखूविरोधी कार्यकर्ती, जाणून घ्या भूमीविषयी 'या' खास गोष्टी

भूमी पेडणेकर आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. 18 जुलै 1989 रोजी मुंबईत जन्मलेल्या भूमीविषयी आज काही खास गोष्टी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै : अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bumhi Pednekar) बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भूमीनं तिच्या पहिल्याच सिनेमातून अनेकांची मनं जिंकली. तिच्या कमाल अभिनयानं तिनं प्रेक्षकांना आकर्षित केलं. भूमी पेडणेकरनं अगदी काही कालावधीत तिचा एक वेगळा असा चाहता वर्ग बनवला आहे. भूमी आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. 18 जुलै 1989 रोजी मुंबईत जन्मलेल्या भूमीविषयी आज काही खास गोष्टी जाणून घेऊया. भूमी पेडणेकर ही सतीश पेडणेकर आणि सुमित्रा हुडा पेडणेकर यांची मुलगी आहे. भूमीचे वडील हे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि कामगार मंत्री होते. सतीश यांचं तोंडाच्या कॅन्सरनं निधन झालं. त्यानंतर तिची आई सुमित्रा हुडा पेडणेकर यांनी तंबाखूविरोधी कार्यकर्ता म्हणून काम केलं. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. भूमी पेडणेकरनं ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत झळकली होती. या चित्रपटातील तिची भूमिका सोपी नव्हती. भूमीनं या चित्रपटात जाड मुलीची भूमिका साकरली होती. यासाठी तिनं तब्बल 90 किलो वजन वाढवलं होतं. मात्र चित्रपटानंतर तिला वजन कमी करणं गरजेचं होतं यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. त्यानंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले. त्यामुळे तिच्या मेहनतीचे आणि अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आलं होतं. पहिल्याच चित्रपटातून दमदार अभिनयानं प्रकाशझोतात आलेली भूमी अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्यापूर्वी यशराज फिल्म्समध्ये सहाय्यक चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करत होती. 6 वर्षे तिनं हे काम केलं. हेही वाचा -  Priyanka Chopra birthday: प्रियांका चोप्राने लग्नाच्या वेळी का जप्त केलेले पाहुण्यांचे मोबाईल फोन; काय आहे ही भानगड? भूमीनं टॉयलेट: एक प्रेम कथा, शुभ मंगल ज्‍यादा सावधान, बाला, पती पत्नि और वो, सांड की ऑंख, बधाई हो, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती नेहमीच हटके भूमिकेत पहायला मिळते. त्यामुळे तिच्या प्रत्येक भूमिकेवर चाहचे कौतुकांचा वर्षाव करत असतात. भूमीची चित्रपट निवडींसाठी एक खास ओळख आहे. कारण ती नेहमीच तिच्या भूमिकेनं चाहत्यांना थक्क करते.

जाहिरात

भूमी पेडणेकरच्या संपत्तीचा आकडाही भलामोठा आहे. भूमी ऐकूण 15 कोटी रुपयांची मालकीण आहे. एका महिन्यात ती 25 लाखांपेक्षा अधिक कमावते. तर वर्षाला तीची कोटींममध्ये कमाई आहे. त्यामुळे ती बाकीच्या अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. कमावण्यातही आणि अभिनयातही. तिच्या अनोख्या व्यक्तीमत्त्वामुळे प्रेक्षक तिला पसंत करतात. दरम्यान, भूमी पेडणेकर लवकरच आनंद एल रॉयच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय भूमी पेडणेकर ‘द लेडी किलर’, ‘भक’, ‘गोविंदा नाम मेरा’, ‘भोद’, ‘तख्त’ आणि ‘अफवा’ या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात