मुंबई, 18 मार्च- ‘मेड इन इंडिया’ या गाण्याचे बोल कानावर पडताच लोक थिरकल्याशिवाय राहतं नाही. या गाण्यानं अलिशा चिनॉयला रातोरात स्टर बनवलं. आज अलिशा तिचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. अलिशाने आतापर्यंत अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 90 च्या दशकात एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे अनु मलिक हे देखील त्यापैकीच एक होते. या गायक-संगीत दिग्दर्शक जोडीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. पण एक काळ असा होता की, या दोघांमध्ये वाद व्हायचे. खरं तर, ‘मेड इन इंडिया’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी अलिशाने अनु मलिक यांच्यावर तिचं लैंगिक शोषण (sexual harassment) केल्याचा आरोप केला होता. या सगळ्यानंतर अलिशा आता काय करते हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज अलिशाचा वाढदिवस आहे चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. बॉलिवूडची लोकप्रिय गायिका अलिशा चिनॉयने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक अल्बमसाठीही आवाज दिला आहे. याच कारणामुळे तिला ‘क्वीन ऑफ इंडियापॉप’ असेही म्हटले जाते. 1985 मध्ये तिने गायनाला सुरुवात केली. तिचे ‘मेड इन इंडिया’ गाणे आजही चाहत्यांना खूप आवडतो. मात्र अचानकचं अलिशा लाईमलाईटच्या जगातून गायब झाली. . ‘कजरा रे’ हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात हिट गाणं आहे. ‘बंटी और बबली’ मधील या गाण्यातून तिनं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले. वाचा- महेश मांजरेकरांचा लेक बनला उद्योजक; ‘या’ क्षेत्रात अजमावणार नशीब बप्पी लाहिरी यांनी अलिशा चिनॉयला प्रथम गाण्याची संधी दिली. त्यांच्यासोबत अलिशानं अनेक सुपरहिट गाणी गायली. अलिळानं 90 च्या दशकातील जवळपास सर्वच बड्या अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे. अलिशाने अनु मलिक यांच्यसोबत अनेक हिट चित्रपट दिले, अनेक रिअॅलिटी सिंगिंग शोमध्ये अनुसोबत ती परिक्षकाच्या भूमिकेत देखील दिसली.अलिशाच्या आयुष्यातील एक काळ असा होती की, तिनं अनु मलिक यांच्यावर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. हे गाण्याच्या प्रमोशनसाठी करण्यात आल्याचा दावा काही लोकांनी केला. तसेत अलिशाने अनु मलिक यांच्याविरोधात तक्रार केल्याची देखील चर्चा होती. शिवाय याप्रकरणी तिनं 27 लाखाची भरपाई देखील मागितली होती. अनु मलिक यांनी मात्र सर्व अरोप फेटाळून लावले होते. त्यांनी अलिशावर 2 करोडचा मानहानीचा दावा देखील दाखल केला होता.
काही दिवसानंतर अलिशा आणि अनु मलिक यांच्यातला वाज मिटल्याचे समोर आलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर सहा वर्षानंतर अलिशा आणि अनु मलिक यांनी ‘इश्क विश्क’ सिनेमासाठी आवज दिला होता. याशिवाय दोघं ‘इंडियन आइडल’ शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत देखील दिसले होते. मीडिया रिपोर्टनुसार, अलिशाला तिच्या पर्सनल लाईमध्ये मात्र अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं. तिने 1986 मध्ये तिचे मॅनेजर राजेश झवेरी यांच्याशी लग्न केले. परंतु हे लग्न केवळ आठ वर्षे टिकले. 1994 मध्ये दोघे वेगळे झाले. अलिशा चिनॉयच्या वडिलांना कॅन्सर झाला होता, तिनं करिअरपेक्षा वडिलांवर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. अनेक वर्षांनंतर ‘चमकेगा इंडिया’ मधून तिनं पुनरागमन केले. पण पूर्वीइतकं ती आता सक्रीय नाही. अलिशाच्या चाहत्यांना आशा आहे की, पुन्हा एकदा इंडी पॉप एखादं नवं गाणं घेऊन येईल आणि चाहत्यांना खूश करेल. सध्या मात्र अलिशा एकटी राहत आहे. तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आहे. अलिशा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते, जुन्या काही आठवणी शेअर करत असते.

)







