मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

निमंत्रण तर नाहीच पण फोटोही नाही; आदित्यनं राणीसोबत केलं होतं असं चोरुन लग्न

निमंत्रण तर नाहीच पण फोटोही नाही; आदित्यनं राणीसोबत केलं होतं असं चोरुन लग्न

आदित्य आणि रानीने 2014 मध्ये लग्न केलं होतं. पण आदित्य रानीच्या प्रेमात फार आदिपासून होते. इतकच काय तर त्यांच्या पहिल्या लग्नाआधीपासून ते रानीच्या प्रेमात होते.

आदित्य आणि रानीने 2014 मध्ये लग्न केलं होतं. पण आदित्य रानीच्या प्रेमात फार आदिपासून होते. इतकच काय तर त्यांच्या पहिल्या लग्नाआधीपासून ते रानीच्या प्रेमात होते.

आदित्य आणि रानीने 2014 मध्ये लग्न केलं होतं. पण आदित्य रानीच्या प्रेमात फार आदिपासून होते. इतकच काय तर त्यांच्या पहिल्या लग्नाआधीपासून ते रानीच्या प्रेमात होते.

  • Published by:  News Digital

मुंबई 21 मे : बॉलिवूडमधील (Bollywood) लाईमलाइट पासून दूर राहणारं कपल म्हणजे अभिनेत्री रानी मुखर्जी (Rani Mukherji) आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra). यश राज फिल्म्स सांभाळणारे आदित्य चोप्रा मीडियापासून कायमचं दूर असतात. इतकच नव्हे तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेल्या रानीसोबत आदित्य यांनी चोरून लग्न केलं होतं.

आदित्य आणि रानीने 2014 मध्ये लग्न केलं होतं. पण आदित्य रानीच्या प्रेमात फार आदिपासून होते. इतकच काय तर त्यांच्या पहिल्या लग्नाआधीपासून ते रानीच्या प्रेमात होते. पण कधीही त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. रानीचा सुपरहिट चित्रपट ‘कुच कुच होता है’ हा देखिल रानीला आदित्य यांच्यामुळेच मिळाला होता हे देखिल आता अनेकांना माहित आहे. पण आदित्य यांनी यावर कधीही विचार केला नाही, व ते प्रेमात होते हे त्यांना स्वतःलाच माहित नसल्याचं त्यांनी एकदा सांगितलं होतं.

आदित्य यांनी 2001 मध्ये पायल खन्ना सोबत विवाह केला पण त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. 2009 मध्ये ते विभक्त झाले. व त्यानंतर आदित्य खऱ्या अर्थाने रानीच्या प्रेमात पडले तर त्यांनी आपलं प्रेमही व्यक्त केलं. आदित्य आणि रानी एकमेकांना डेट करू लागले व तर अनेक पार्ट्यांमध्ये ते एकत्र स्पॉट होत होते. पण ते आपली रिलेशनशिप जाहीर करत नव्हते. तर आदित्य यांच्या घटस्पोटाच्या 5 वर्षांनंतर 2014 मध्ये दोघांनीही लग्न केलं. पण हे लग्न अतिशय प्रायव्हेट ठेवण्यात आलं होतं.

जॅकलिन फर्नांडिझचं हॉलिवूडमध्ये पदार्पण; साकारणार ‘ही’ भूमिका

इटली मध्ये लग्न पार पडलं होतं. तर केवळ घरच्या मंडळीसोबत आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यात आलं. पण लग्नाचा कोणताही फोटो आजपर्यंत कधीच बाहेर आला नाही. तर लग्नाविषयी कोणतीचं माहिती आधी कळवण्यात आली नव्हती.

2015 मध्ये रानी आणि आदित्य त्यांच्या मुलीचा अदिराचा जन्म झाला. आदित्य आणि रानी यांच्या नावावरून अदिरा हे नाव ठेवण्यात आलं होत. त्यावेळी यश राज फिल्म्स ने एक पत्रक जाहीर करून याची माहिती दिली होती. रानी आणि आदित्य हे कपल आजही मीडियापासून दूरच असते.

आज 21 मे आदित्य चोप्रा यांचा आज 50 वा वाढदिवस आहे. परंतू वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करता ते  पैसे ते कोरोनाग्रस्तांसाठी दान करणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

First published:

Tags: Entertainment, Rani got married to aditya chopra