मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जॅकलिन फर्नांडिझचं हॉलिवूडमध्ये पदार्पण; साकारणार ‘ही’ भूमिका

जॅकलिन फर्नांडिझचं हॉलिवूडमध्ये पदार्पण; साकारणार ‘ही’ भूमिका

काही दिवसांपूर्वी जॅकलिनच्या हॉलिवूड (Hollywood debut) पदार्पणाची बातमी आली होती. ‘वुमेन्स स्टोरी’ (Women’s story) असं या चित्रपटाचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी जॅकलिनच्या हॉलिवूड (Hollywood debut) पदार्पणाची बातमी आली होती. ‘वुमेन्स स्टोरी’ (Women’s story) असं या चित्रपटाचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी जॅकलिनच्या हॉलिवूड (Hollywood debut) पदार्पणाची बातमी आली होती. ‘वुमेन्स स्टोरी’ (Women’s story) असं या चित्रपटाचं नाव आहे.

मुंबई, 19 मे : बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावल्यानंतर आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez) हॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलिनच्या हॉलिवूड (Hollywood debut) पदार्पणाची बातमी आली होती. पण जॅकलिन नेमक्या कोणत्या चित्रपटात व कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत समजलं नव्हतं. आता जॅकलिनच्या भूमिकेविषयी माहिती समोर आली आहे.

जॅकलिन एका सहा भागांच्या (6 parts anthology) चित्रपटात काम करणार आहे. ‘वुमेन्स स्टोरी’ (Women’s story) असं या चित्रपटाचं नाव आहे. जॅकलिन ‘पार्च्ड फेम’ लीना यादवच्या (Leena Yadav) दिग्दर्शित ‘शेरिंग अ राईड’ (Sharing a ride)  या भागात दिसणार असल्याचं वृत्त पिंकविला वेबसाईटने दिलं होतं. यामध्ये जॅकलिन एका पोलिसाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जॅकलिन या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर मॉडेल सोबत काम करणार आहे. अंजली लामा असं या मॉडेलचं नाव आहे. याशिवाय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जॅकलिनने तिच्या या नव्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा प्रोजेक्ट जाहीर होण्याआधीच शूटिंग पूर्ण झालं होत. संपूर्ण चित्रपटांच शूटिंग हे मुंबईत चित्रित झालं आहे, तर मुख्यतः चित्रपटाची कथा ही सीएसएमटी स्टेशनच्या आसपास फिरणारी आहे. जॅकलिन पोलिसाची भूमिका साकारणार आहे. स्टेशनच्या आसपार बरचसं शूट करण्यात आलं आहे.’

Happy Birthday:'किराणा दुकानात काम ते प्रसिद्ध लेखक' पाहा रस्किन बॉन्ड यांचा प्रेरणादायी प्रवास..

जॅकलिनला सध्याची बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक चित्रपट सध्या जॅकलिनच्या हातात आहेत. हा हॉलिवूड चित्रपटही ती करत आहे. नुकतीच जॅकलिन सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे’ चित्रपटात ‘दिल दे दिया’ या गाण्यात दिसली होती. याशिवाय जॅकलिनकडे ‘भूत पोलिस’, ‘बच्चन पांडे’, ‘सर्कस’, ‘अटॅक’, ‘किक 2’ आणि ‘राम सेतू’ असे मोठे चित्रपटही आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Hollywood, Jacqueline fernandez