जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘कर्जाच्या ओझ्याखाली होतो आम्ही...’, आदिनाथने सांगितला सर्वांत कठीण काळाचा संघर्ष

‘कर्जाच्या ओझ्याखाली होतो आम्ही...’, आदिनाथने सांगितला सर्वांत कठीण काळाचा संघर्ष

‘कर्जाच्या ओझ्याखाली होतो आम्ही...’, आदिनाथने सांगितला सर्वांत कठीण काळाचा संघर्ष

आदिनाथ कोठारेचा 13 मे हा वाढदिवस (Adinath Kothare birthday). त्यानिमित्त त्याच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांची, संघर्षाची कहाणी.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 मे : मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची (mahesh  and adinath Kothare Family) ओळख आहे. तर फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर सद्य घडीला अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती ते करताना दिसतात. पण असेही कधी कठीण दिवस आले होते जेव्हा कोठारे कुटुंब हे कर्जाच्या ओझ्याखाली होतं. खुद्द आदिनाथ कोठारेनेच (Adinath Kothare)  हा प्रसंग सांगितला आहे. आदिनाथ कोठारेचा 13 मे हा वाढदिवस. त्यानिमित्त त्याच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांची, संघर्षाची कहाणी. आदिनाथने या संघर्षाची कथा स्वतःच सांगितली होती. महाराष्ट्र टाइम्सने आदिनाथचा यासंबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. प्रसंग एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. आदिनाथ तेव्हा नवतरुण होता. नुकताच कॉलेजला जायला लागला होता. एका नामवंत पुरस्कार सोहळ्यात कोठारे यांना चित्रपटासाठी नामांकन मिळालं होतं जिथे अनेक मोठे बॉलिवूड स्टार्सही येतात. त्यावेळी कोठारे कुटुंबावर कर्ज होतं त्यामुळे काही गोष्टींची तडजोड करावी लागत होती. तर कोठारे कुटुंब हे सेकन्ड हँड जुनी कार वापरत होतं. पण त्या पुरस्कार सोहळ्यात मात्र सगळ्या कलाकरांच्या नवीन पॉश आणि महागड्या गाड्या होत्या. आपल्याकडे जुनी गाडी आहे याचं त्याला वाईट वाटत होतं. पुढे आदिनाथ ने सांगितलं की, ‘मीडिया ला पोझ देण्यासाठी आम्ही आलो. त्यानंतर थेट गाडीत बसून घरी जायचं होतं. पण ती जुनी गाडी आता सगळ्यासंमोर येणार म्हणून मला वाईट वाटत होतं. तिला धक्के मारून सुरू करावं लागलं तर? तेव्हा आता लोकांसमोर नाचक्की होणार याची भीती आदिनाथला होती. पण उशीरा को होईना ड्रायव्हरने पार्किंग मधून ती गाडी आणली सगळे जण गाडीत बसले. जमलेल्या प्रेक्षकांचं गाडीवर नाही तर आमच्यावर प्रेम होत हे जाणवलं.’ ‘येऊ कशी ती मी नांदायला’च्या सेटवर ‘त्या’ पत्राने बदललं वातावरण; शुभांगी गोखले झाल्या भावुक पुढे आदिनाथ म्हणतो, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आमच्या कुटुंबाच्या जीवनातही आले. माझ्या वडिलांनी यशाचं शिखर गाठलेलं. लागोपाठ सहा-सात सुपरहिट चित्रपट केले होते. तेव्हा मी खूप लहान होतो. मी दहावीत असताना त्यांनी एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या डोंगराखाली आम्ही पुढची दहा वर्षे काढली. पण त्या डोंगराच्या सावलीतही एका वादळाला झुंज देणाऱ्या पर्वतासारखे उभे राहाणारे माझे आई-वडील मी कधीच विसरू शकणार नाही.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात