मुंबई 12 मे : छोट्या पडद्यावर अनेक खऱ्या आयुष्यातील मायलेकींच्या जोड्या पहायला मिळतात. यातीलच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) आणि त्यांची लेक अभिनेत्री सखी गोखले (Sakhee Gokhale) . आपल्या अभिनयाने तर त्या प्रेक्षकांवर छाप सोडतातच पण त्याचं मायलेकींच नातं अनेकदा प्रकर्षाने जाणवतं. असच काहीसं या मातृदिनाला पहायला मिळालं, जेव्हा सखीने आपल्या आईसाठी एक पत्र पाठवलं होत. शुभांगी गोखले या सध्या कलर्स मराठी (Colors Marathi) वरील ‘राजा राणीची गं जोडी’ आणि झी मराठी (zee Marathi) वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांमध्ये एकाच वेळी काम करत आहेत. तर नुकतंच त्यांनी ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेचं काही भागांच शूट करून त्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचं शूट करण्यासाठी पोहोचल्या. पण मातृ दिनाच्या निमित्ताने मालिकेच्या सेट वर एक केक आणि एक पत्र अचानकपणे पोहोचलं त्यामुळे सगळ्या टीम ला आनंदाचा धक्का बसला.
मोठा मजकूर असणारं हे पत्र होतं. त्यातील काही ओळी होत्या, “अम्मा, अदिती, दीप्ती, शुभांगी तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी थँक्स. आमचे चांगले जीवन जावे म्हणून घरापासून दूर राहून काम करताय त्यासाठी थँक्यू” सखीच्या या प्रेमाणे शुभांगी यांच्यासह सेट वरील सगळ्या स्त्रिया भावूक झाल्या. तर सगळ्यांना रडू कोसळलं.
शिवानीनं लॉकडाउनमध्ये केलं फोटो शूट; पाहा मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करतेय?‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेचं चित्रिकरण हे महाराष्ट्रातील लॉकडाउन नंतर गोव्यात सुरू होतं. तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ चं शुट हे सिल्व्हासा ला सुरू आहे. तर आता गोव्यातील चित्रिकरणालाही बंदी घातली आहे. तेव्हा शुभांगी गोखले आता फक्त ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचं शूट करत आहेत.