• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Good News! अखेर जेठालालला मिळाली नवी 'दया'; पाहा कोण आहे ती अभिनेत्री

Good News! अखेर जेठालालला मिळाली नवी 'दया'; पाहा कोण आहे ती अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehata Ka Oolta Chashma) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehata Ka Oolta Chashma) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मात्र या मालिकेतील सर्वात जास्त पसंत केलं जाणारं पात्र म्हणजे दया भाभी (Daya Bhabhi)आणि जेठालाल होय.
  या दोघी व्यक्तिरेखांनी सर्वांना भुरळ घातली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत दयाची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तेव्हापासून सर्वांना मालिकेत नवीन दया कोण येणार याचीच उत्सुकता लागली आहे. (हे वाचा:PHOTOS: गौहर खानचा रॉयल अंदाज; लेहंग्यामध्ये दिसतेय खूपच सुंदर) नुकताच आपल्याला एक नवी दया भाभी पाहायला मिळाली आहे. हि दया भाभी दुसरी कोणी नसून 'गुम है किसी के प्यार में' मालिकेतील मुख्य अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आहे. नुकताच ऐश्वर्याने दया भाभीच्या डायलॉगवर लीप सिंक केलं आहे. तसेच त्याचा रियल लाईफ पती आणि मालिकेतील अभिनेता नील भट्टने यात जेठालाल साकारलं आहे. (हे वाचा:रश्मी देसाईचा ग्लॅमरस अवतार; Bigg Boss OTT मध्ये लागणार बोल्डनेसचा तडका) हा मजेशीर व्हिडीओ नुकताच या कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे त्यांना दया आणि जेठालाल म्हटलं जात आहे. याआधीसुद्धा अनेक कलाकारांनी दया आणि जेठालालच्या डायलॉग्सवर लीप सिंक केलं आहे. सध्या हा मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र मालिकेत दया भाभी म्हणून दिशा वकानीची जागा कोण घेणार याची उत्कंठा वाढतचं चालली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: