छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने पुन्हा एकदा आपल्या हॉट लुकने सर्वांना घायाळ केलं आहे. नुकताच रश्मीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले किलर फोटो शेअर करत सर्वांना वेड लावलं आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये रश्मी फिकट निळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये एकदम बोल्ड दिसत आहे. रश्मीने हा लुक खास एका कारणासाठी केला आहे. ते कारण म्हणजे 'बिग बॉस OTT' होय. नुकताच रश्मीने बिग बॉस ott मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने हा ग्लॅमरस अवतार घेतला होता. रश्मीने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करताच मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. रश्मी देसाई अलीकडे आपल्या बोल्डनेसने सर्वांना घायाळ करत आहे.