Home /News /entertainment /

KBCच्या मंचावर नीरज- श्रीजेश बिग बींना शिकवणार हरियाणवी; बच्चन म्हणाले, 'अरे देवा'

KBCच्या मंचावर नीरज- श्रीजेश बिग बींना शिकवणार हरियाणवी; बच्चन म्हणाले, 'अरे देवा'

शुक्रवारच्या एपिसोडमध्ये, हॉट सीटवर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश (Shreejesh) हे बसणार आहेत.

  मुंबई 16 सप्टेंबर : यावेळी ‘कौन बनेगा करोडपती’चा (Kaun Banega Crorepati 13) (KBC) शुक्रवारचा भाग खूप खास असणार आहे. या आठवड्याच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये, हॉट सीटवर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश (Shreejesh)  हे बसणार आहेत. केबीसी 13 च्या या विशेष भागात, नीरज चोप्राची देखील एक वेगळी शैली दिसणार आहे. नीरज हा मुळचा हरियाणाचा आहे. त्यामुळे तो चक्क अमिताभ बच्चन यांना हरियाणवी शिकवताना दिसत आहे. सोनी टीव्हीने (Sony Tv) याचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. व्हिडीओत अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटाचे काही मूळ संवाद हिंदीमध्ये बोलतात आणि ते नीरजला हरियाणवीमध्ये बोलण्यास सांगत आहेत. नीरज देखील ते बालून दाखवतो तेव्हा अमिताभ बच्चन हसू लागतात. यानंतर, हॉकी संघाचे गोलरक्षक श्रीजेशने अमिताभ बच्चन यांना विचारलं की तुम्ही कधी हरियाणवी चित्रपटात काम केलं आहे का?, यावर अमिताभ बच्चन म्हणाले की त्यांनी चित्रपटात काम केलं नाही परंतु काही संवाद हरियाणवीमध्ये बोलले आहेत.
  श्रीजेश अमिताभ बच्चन यांना म्हणतात की आता ते दोघे आले आहेत, तर आम्ही तुम्हाला हरियाणवी शिकवू, त्यावर अमिताभ 'अरे देवा' म्हणत हसू लागतात. यानंतर ते जंजीर चित्रपटातील काही संवाद हरियाणवीमध्ये बोलतात. एका प्रोमोमध्ये नीरजने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या जंजीर चित्रपटातील संवाद हरियाणवीत शिकवत आहे. अमिताभ यांनीही ते योग्य रितीने म्हटले आहेत.
  पुढे पीआर श्रीजेशने सांगितलं की, की ऑलिम्पिक 2021 ने त्यांचं आणि संपूर्ण संघाचं आयुष्य एका रात्रीत कसं बदललं. “2012 च्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरल्यानंतर आम्ही एकही सामना जिंकला नाही. आम्ही देशात परतल्यावर लोक आमच्यावर हसायचे. जेव्हा ते एखाद्या कार्यक्रमाला जात असे, तेव्हा त्यांना मागच्या बाजूला बसवलं जायचं. आमचा अनेकदा खूप अपमान झाला. कधीकधी मला प्रश्न पडायचा की आपण हॉकी का खेळत आहोत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आम्ही खेळाडूंना हेच सांगितलं, फक्त विचार करा की यापुढे कोणताही सामना नाही. आता पदक जिंकल्यानंतर असं वाटतं की मी जेव्हढं अधिक ऐकलं, जितका संघर्ष केला तितकाच मी रडलो. ते सर्वकाही आता दूर गेलं.”
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Olympics 2021

  पुढील बातम्या