रियानं 8 जूनला सुशांतचं घर का सोडलं? वकिलांनी केला मोठा खुलासा

रिया चक्रवर्तीने सुशांतचं घर का सोडलं याचं कारण आता तिच्या वकिलांनी दिलं आहे. काय म्हणाले वाचा सविस्तर

रिया चक्रवर्तीने सुशांतचं घर का सोडलं याचं कारण आता तिच्या वकिलांनी दिलं आहे. काय म्हणाले वाचा सविस्तर

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोप करण्यात आल्यानंतर आता रिया चक्रवर्ती हिने सुशांतसिंह राजपूत याच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करून सुशांतला चुकीची औषधं दिल्याचा आरोप त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्यावर रियाने केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करणं आमचं कर्तव्य असल्याचं म्हणत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि रियाचा एफआयआर दाखल करून घेतला आहे. डॉक्टरांनी सुशांतला ड्रग्सचं सेवन बंद करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याने रिया चक्रवर्तीचा आणि डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्याने अखेर सुशांतच्या इच्छेनुसार तिने त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. सुशांतच्या बहिणींनीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. "प्रियांका आणि मितू यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून रिया चक्रवर्तीने दिलेल्या माहितीनुसार हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई मिररच्या वृत्तानुसार रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी या दोन बहिणींवर आरोप केले होते. सुशांतच्या दोन्ही बहिणींनी त्याच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज असताना देखील चुकीची औषधे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. 8 जून 2020 ला प्रियंका सिंह हिने सुशांतसिंहला मेसेज करून काही औषधं सांगितली होती. ती औषधं प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णाला देता येत नाहीत. तो गुन्हा ठरतो. हे वाचा-लिव्ह इन पार्टनरसाठी उपवास का ठेवला म्हणत कुटुंबियांनी दिला पोलिसांसमोर चोप सुशांतच्या बहिणीनी प्रस्क्रिप्शनमध्ये खाडखोड करून त्याला औषध दिल्याचा आरोप करत रिया चक्रवर्तीने त्याच्या बहिणीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर सुशांतसिंह हा मानसिक आजारी असून मुंबईत उपचार घेत असल्याचं माहीत असतानादेखील त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ही औषधे देणं सुरूच ठेवल्याचा आरोप रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर सुशांतला पाच डॉक्टरांनी त्याची मानसिक स्थिती पाहून ड्रग्स घेण्याचं थांबवायला सांगितलं होतं, असा आरोपदेखील या वेळी सतीश मानेशिंदे यांनी केला. परंतु सुशांतने याला विरोध केल्याने 14 जूनला सुशांतच्या आत्महत्येअगोदर 8 जूनला रियाने त्याचे घर सोडले होते. डॉक्टरांनी त्याला ड्रग्सचे सेवन बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने रिया चक्रवर्तीचा आणि डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्याने अखेर सुशांतच्या इच्छेनुसार तिने त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचेदेखील मानेशिंदे यांनी सांगितलं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: