मुंबई 11 जुलै: गिरीजा ओक (Girija Oak) ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या अभिनेत्रीने विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी संज्ञा शोधून काढली आहे. तमाशा live (Tamasha Live marathi movie) सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये गिरिजाने दिलेल्या या भन्नाट उत्तराने सगळीकडे हशा पिकताना दिसत आहे. नेमकं काय म्हणाली गिरीजा? गिरिजला तिच्या आयुष्यातला #‘काय तमाशा लावलाय?’ moment सांगायचा होता. म्हणजे एक असा प्रसंग सांगायचा होता जिथे तिला वैताग आला आहे. त्यावेळी तिने असं सांगितलं, ‘असे तर अनेक प्रसंग आहेत पण मी अगदी आत्ता ताजा घडलेला एक प्रसंग सांगणार आहे. इव्हेंटला येताना सिग्नलला एवढा कोलाहल चालू होता की ते ट्रॅफिक बघून मला काय तमाशा लावलाय असं वाटत होतं. सिग्नलला सगळीकडून गाड्या येत होत्या. मी अशा सगळ्या विनाकारण गाडी घुसवणऱ्या, हॉर्न मरणाऱ्यांसाठी एक उपमा शोधून काढली आहे. लहानपणी माझा मुलगा मला विचारायचा की हे सारखे हॉर्न का वाजवत आहेत, घाई का करत आहेत. आता लहान मुलाला काय समजणार म्हणून मी एक उपमा शोधून काढली. मी त्याला सांगायचे की त्यांना घाईची शी लागली आहे. कारण त्याशिवाय एवढी घाई कोणीच करणार नाही. हे ही वाचा- Tamasha Live: संजय आणि उमेश जाधव ट्रेंडिंग गाण्यावर उडवतायेत धमाल, अफलातून Video पाहाच “आत्ता वाटेत बहुधा सगळ्यांनाच घाईची लागली होती म्हणून वाटेल तशा गाड्या सगळीकडून शिरत होत्या. मग सगळ्यांच्या काचा खाली झाल्या, आरडाओरडा सुरु झाला. मला कळत नाही एवढी घाई करून तुम्हाला काय मिळतं? नेमकं कुठे पोहोचायचं आहे तुम्हाला?”
गिरीजा ही सध्या सिनेमात किंवा मालिकेत अभिनय करताना दिसत नसली तरी ती एका भन्नाट कलाकृतीतून समोर येणार असल्याचं कळत आहे. ‘महानगर के जुगनू’ नावाचं एक नवंकोरं नाटक घेऊन गिरीजा समोर येत आहे अशी माहिती मिळत आहे. या नाटकाचा एक टिझर सुद्धा तिने शेअर केला आहे. आता गिरीजा यात नेमकी कोणती भूमिका निभावत आहे हे अजून समोर आलेलं नाही.
गिरीजा एक यशस्वी उद्योजिका म्हणून सध्या काम करत आहे. ‘फ्रेश लाईम सोडा’ असा भन्नाट नावाने ती स्वतःचा कपड्यांचा ब्रँड चालवते. गिरीजा तिच्या मुलासोबतचे अनेक क्षण सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते. तिला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला चाहते उत्सुक झाले आहेत.