मुंबई 11 जुलै: सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी यांच्या अभिनयाने सजलेला ‘तमाशा live’ (Tamasha Live marathi movie) हा चित्रपट येत्या 15 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘रंग लागला’ गाण्याने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सुद्धा या गाण्याचे हजारोंमध्ये रील्स बनताना दिसत आहेत. आता या गाण्यावर सिनेमातील दोन महत्त्वाची लोक सुद्धा थिरकताना दिसत आहेत. रंग लागला हे गाणं कोरिओग्राफ केलेले उमेश जाधव (Umesh Jadhav) आणि सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) हे दोघे सध्या रंग लागला गाण्यावर धमाल उडवून देताना दिसत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) या दोघांचा धमाल व्हिडिओ शेअर करत त्यात UJ loves SJ अशी कॅप्शन दिली आहे. दोघेही गाण्यावर गरबा नृत्य करताना दिसत आहेत. या सिनेमाचं भन्नाट पद्धतीने प्रमोशन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. संधी मिळेल तिथे या सिनेमाची कास्ट या गाण्यावर नृत्य करताना पाहायला मिळत आहे. सोनाली कुलकर्णी आणि फुलवा खामकर यांनी काहीच दिवसांपूर्वी लंडनच्या टॉवर ब्रिजवर सुद्धा या गाण्यावर ताल धरत सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. एवढंच नव्हे तर खुद्द संजय जाधव यांच्या मुलीने सिनेमातील इतर काही स्त्री अभिनेत्रींना सोबत घेऊन एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात संजय जाधव सुद्धा थिरकताना दिसले होते. सगळ्या गोपिकांमध्ये कृष्ण नाचावं असं काहीसं हे दृश्य दिसत होतं असं सांगितलं जात आहे. सध्या उमेश आणि संजय जाधव या दोघांचा विडिओ चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. हे ही वाचा- मी पुन्हा येईन! महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजच्या माध्यमातून; Teaser पाहिलात का? “संजय जाधव आणि उमेश जाधव यांनी याआधी सुद्धा बरेच प्रोजेक्ट एकत्र केले आहेत. उमेश जाधव यांनी बायगो बायगो सारखी अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ केली आहेत. त्यांच्या नृत्यात कायम एक वेगळेपण दिसून येतं असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे.
सध्या संजय जाधव सुद्धा तमाशा live सिनेमाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करताना दिसत आहेत. मराठीत एक म्युजिकल सिनेमा तमाशा live च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. दोन पत्रकारांच्या आयुष्यात चालणारी ही एक झुंज असणार आहे असं टीजर आणि ट्रेलरवरून समजत आहे.