मुलासह आक्षेपार्ह फोटोशूट करणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीला आता कोर्टाकडून मोठा दिलासा

मुलासह आक्षेपार्ह फोटोशूट करणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीला आता कोर्टाकडून मोठा दिलासा

घानाची अभिनेत्री (ghana actress) रोजमोंड ब्राऊनला (rosemond brown) मुलासोबत आक्षेपार्ह फोटोशूट केल्याने तुरुंगवास ठोठावण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : सर्वांपेक्षा वेगळं करण्याच्या नादात अभिनेत्री सतत नवनवीन प्रयोग करत असतात. कधी हे प्रयोग यशस्वी होतात. तर कधी या गोष्टी अंगलट येतात. असाच काहीतरी वेगळं करण्याचा फटका  घानाची अभिनेत्री (ghana actress) रोझमोंड ब्राऊनला (rosemond brown) बसला. तिने आपल्या मुलासोबत ‘न्यूड फोटोशूट’ (nude photoshoot)  केलं, जे तिला चांगलंच महागात पडलं. तिला जेलची हवा खावी लागली. पण आता तिला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने तिला जामीन मंजूर केला आहे.

अश्लीलता आणि कौटुंबिक हिंसाराचा प्रचार करण्याचा ठपका ठेवत रोजमोंड ब्राऊनला 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात (3 months jail) आली होती. पण आक्राच्या (accra) न्यायालयाने तिला जामीन दिला आहे.

रोझमोंड ही एक सिंगल मदर आहे. तिने आपल्या मुलाच्या सातव्या वाढदिवसाला एक न्यूड फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करताच घानासोबत सर्वत्रच मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. या अभिनेत्रीवर मोठ्या प्रमाणात टीकासुद्धा करण्यात आली होती. तिच्या या फोटोवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर तिला हा फोटो सोशल मीडियावरून डिलीट करावा लागला होता. इतकंच नव्हे तर तिला सोशल मीडियावर जाहीर माफीही मागावी लागली.

हे वाचा - आई कुठे काय करते?' फेम 'संजना'चा HOT अवतार; फोटो होतायेत VIRAL)

त्या न्यूड फोटोवरून अभिनेत्रीविरोधात संपूर्ण देशात अभिनय राबविण्यात आलं होतं. पण अमेरिकन रॅपर कार्डी बीने रोझमोंडला सपोर्ट करत एक ट्वीट केलं होतं. त्यात तिनं म्हटलं होतं, "मी अशापद्धतीचे अनेक फोटोशूट अमेरिकेत पाहिले आहेत. ही माझी स्टाईल नाही. मात्र हे लैंगिक किंवा अश्लील नाही. ही एक नैसर्गिक फोटोशूटची पद्धत आहे आणि यासाठी जेल ही खूपच कठोर शिक्षा आहे.

हे वाचा - कार्तिक आर्यनला डच्चू; आता खिलाडी अक्षय कुमारसोबत करण जोहरचा Dostana 2? )

दरम्यान न्यायालयाने अभिनेत्रीच्या दया याचिकेवरसुद्धा दृष्टीक्षेप टाकला. ज्यात तिने दु:ख व्यक्त करत माफी मागितली होती. त्यानंतर रोझमोंड ही एक सिंगल मदर असल्यामुळे तिला फक्त 90 दिवसच जेलमध्ये काढावे लागतील, असा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर घानामध्ये खेद व्यक्त करण्यात आला होता. आता तर न्यायालयाने तिला जामीनही मंजूर केला आहे.

Published by: Aiman Desai
First published: April 22, 2021, 8:59 PM IST

ताज्या बातम्या