'आई कुठे काय करते?' फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतंच आपलं बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
2/ 10
रुपाली ही मराठी अभिनय सृष्टीतील एक ओळखीचं नाव आहे. रुपाली आपल्या अभिनयासोबतच आपल्या स्टाईलमुळे सुद्धा चर्चेत असते.
3/ 10
रुपाली भोसले बिग बॉस मराठीमुळेसुद्धा खूपच प्रसिद्धीत आली होती. यात रुपालीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती.
4/ 10
रुपाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
5/ 10
पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न दोन्हीत रुपाली अगदी खुलून दिसते.
6/ 10
नुकतंच रुपालीने स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःलाच एक कार गिफ्ट केली होती आणि तिचे फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
7/ 10
रुपालीने मराठीसोबतच 'बडी दुरसे आये है' या हिंदी मालिकेतसुद्धा काम केलं आहे. त्यात अभिनेता सुमित राघवन तिच्या जोडीला होता.
8/ 10
रुपालीने दिल्या घरी तू सुखी राहा, गोजिरवाण्या घरात, कन्यादान अशा अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
9/ 10
रुपालीने मालीकांसोबतचं अनेक नाटकांमध्येसुद्धा काम केलं आहे.
10/ 10
रुपाली सध्या 'आई कुठे काय करते?' या मराठी मालिकेमध्ये 'संजना' ही भूमिका साकारत आहे.