Home /News /entertainment /

पूनम पांडेचे गंभीर आरोप; High Court त याचिका दाखल, राज कुंद्रानं लीक केला होता माझा पर्सनल मोबाइल नंबर

पूनम पांडेचे गंभीर आरोप; High Court त याचिका दाखल, राज कुंद्रानं लीक केला होता माझा पर्सनल मोबाइल नंबर

Poonam Pandey On Raj Kundra: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेनं राज कुंद्राच्या अॅडल्ट फिल्म प्रकरणी (Adult Case) भाष्य केलं होतं.

  मुंबई, 22 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणात आता नवीन अपडेट येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Pandey) राज कुंद्राच्या अॅडल्ट फिल्म प्रकरणी (Adult Case) भाष्य केलं होतं. त्यानंतर आता पूनमनं मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) एका याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पूनमनं राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीशी संबंधित काही लोकांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण त्याच्या अ‍ॅपशी संबंधित आहे. मला धमकी देण्यात आली होती. मला जबरदस्ती करारावर साइन करण्यास भाग पाडलं होतं. त्या करारात लिहिलं होतं की, मला शूट करावे लागेल, पोज द्याव्या लागतील. मला काही खास अंदाजात दाखवावा लागेल. जो त्यांच्या मागणीनुसार असेल. अन्यथा त्यांनी माझ्या वैयक्तिक गोष्टी लीक केल्या असत्या. पुढे पूनमनं म्हटलं की, जेव्ही मी करारावर साइन करण्यासाठी तयार नव्हती आणि मला करार टर्मिनेट करायचं होत. त्यावेळी या लोकांनी माझा पर्सनल मोबाइल नंबर या मॅसेजसोबत लीक केला. 'मला आता फोन करा. मी तुमच्यासाठी कपडे काढेन'. यानंतर मला बरेच फोन आहे. हजारोंच्या संख्येनं मला कधीही फोन येत होते आणि माझ्याकडे नको त्या गोष्टींची मागणी करत होते.
  पूनम पुढे सांगते की, यानंतर लोकांनी मला अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली होती. काही विपरीत घडू नये यासाठी मी माझं घरही सोडलं होतं. मी खूप घाबरली होती. पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा बडा नेता भेटीला माझ्या वकीलानं इशारा देऊनही मी आज यावर वक्तव्य करत आहे. राज कुंद्रा माझ्यासोबत हे करू शकतो. मी एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहे, तर मग तो इतर लोकांकडून कोणत्या प्रकारची कामे करून घेऊ शकेल याचा विचार करा. हे कधी आणि केव्हा थांबेल. हे जाणून घेणे खूप कठीण आहे. यामुळेच मी सर्वांना विनंती करते. खासकरुन त्या मुलींना ज्या या प्रकरणात पीडित आहेत. त्यांनी पुढे यावं आणि यावर आवाज उठवावा.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Bollywood, Poonam pandey, Raj kundra, Shilpa shetty, The Bombay High Court

  पुढील बातम्या