जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आयरा खानचा मोठा खुलासा; Self careच्या नावाखाली करत होती स्वत:चं नुकसान

आयरा खानचा मोठा खुलासा; Self careच्या नावाखाली करत होती स्वत:चं नुकसान

आयरा खानचा मोठा खुलासा; Self careच्या नावाखाली करत होती स्वत:चं नुकसान

तिने सेल्फ केअरबद्दल सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Ira Khan about Self-care) मात्र या माध्यमातून ती स्वत:चं नुकसान करत असल्याचा दावा देखील तिने केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 18 जुलै**:** आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र तरी देखील एखाद्या सेलिब्रिटीला लाजवेल असं तिचं फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर आहे. तिची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. (Ira Khan Video Viral) अन् ती देखील विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करत फॉलोअर्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने सेल्फ केअरबद्दल सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Ira Khan about Self-care) मात्र या माध्यमातून ती स्वत:चं नुकसान करत असल्याचा दावा देखील तिने केला आहे. “प्रत्येकाचा आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही निराश असता. अन् अशा स्थितीत आपण आपल्या मानसिक स्थितीची काळजी घ्यायला हवी. आपण अशा स्थितीत चुकीचे पर्याय स्विकारतो. याला आपण सेल्फ केअर म्हणतो. परंतु ते सेल्फ केअर नाही. आपण सेल्फ केअरच्या नावाखाली स्वत:चं नुकसान करत असतो.” अशा आशयाची माहिती देत तिने सेल्फ केअर म्हणजे काय? हे चाहत्यांना सांगितलं. शिवाय येत्या 24 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिनानिमित्तानं ती मानसिक स्थिती तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही सोपे उपाय देखील सांगणार आहे. ‘…त्यावेळी उपचारासाठी नव्हते पैसे’; नाना पाटेकर वडिलांच्या आठवणीनं झाले भावुक

जाहिरात

राखी सावंतची अनोखी भेट; दिशा-राहुलला दिलं हे लाखोंचं गिफ्ट आयरा आपल्या मानसिक स्थितीबद्दल अनेकदा उघडपणे बोलते. आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे तिच्या मनावर विपरित परिणाम झाले हा अनुभव देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. नैराश्येत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तिने अगास्तु फाऊंडेशन नामक एक स्वयंसेवी संस्था देखील सुरु केली आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती या संस्थेत कार्यरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात