जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Gautami Patil: आता गावच्या सत्यनारायणाच्या पुजेला पण गौतमी पाटीलचा डान्स; कोणतं गाव?तुम्हीच वाचा

Gautami Patil: आता गावच्या सत्यनारायणाच्या पुजेला पण गौतमी पाटीलचा डान्स; कोणतं गाव?तुम्हीच वाचा

सत्यनारायणाच्या पुजेला गौतमी पाटीलचा डान्स

सत्यनारायणाच्या पुजेला गौतमी पाटीलचा डान्स

Gautami Patil Latest Update: राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. यात्रा असो किंवा पुढाऱ्यांचा वाढदिवस गौतमी पाटीलचा कार्यक्रम आवर्जून आयोजित केला जात आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 मे- राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. यात्रा असो किंवा पुढाऱ्यांचा वाढदिवस गौतमी पाटील चा कार्यक्रम आवर्जून आयोजित केला जात आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत गौतमीच्या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती पाहायला मिळते. अनेकवेळा गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध झालेला पाहायला मिळतो. तर काही लोक गौतमी पाटीलसोबत लग्न करण्याची स्वप्नेसुद्धा पाहात आहेत. अशातच आता गौतमी पाटीलला चक्क सत्यनारायणाच्या पूजेच्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं आहे. गौतमी पाटील सध्या राज्यातील सर्वात महागडी नृत्यांगना बनली आहे. एका कार्यक्रमासाठी गौतमी 1 ते 3 लाखांपर्यंत मानधन घेते. गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान गौतमीच्या कार्यक्रमात सतत वादविवाद आणि राडे होतंच असतात. गौतमीचा कोणताच कार्यक्रम विचित्र घटनांशिवाय पार पडलेला पाहायला मिळत नाही. आवण नेहमीच यात्राजत्रा, पुढाऱ्यांचा वाढदिवस किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं ऐकलं आहे. मात्र आता गौतमी पाटीलला चक्क सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं आहे. यावर काहींनी पाठिंबा दिला आहे तर काही लोकांनी रोष व्यक्त केला आहे. (हे वाचा: Gautami Patil: गौतमी पाटीलचा कार्यक्रम करताय? मग तुमच्याही खिशाला लागणार चौपट झळ, कसं तुम्हीच पाहा ) वसई येथील खार्डी याठिकाणी होणाऱ्या सत्यनारायण पूजेनिमित्त एका कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं आहे. येत्या २५ तारखेला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या गावात पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मांडवी पोलीस कर्मचाऱ्यांना याठिकाणी बंदोबस्त करावा लागणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गौतमीच्या लोकप्रियतेचा परिणाम आयोजकांच्या खिशावर होणार आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कोणताही राडा होऊ नये यासाठी बंदोबस्त म्हणून बोलवण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना चौपट पैसा द्यावा लागणार आहे. सांगोला याठिकाणी असलेल्या घेरडी या गावात सर्वप्रथम पेड पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांनतर आता हीच पद्धत दुसरीकडे सुरु झाली आहे. मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पेड पोलीस बंदोबस्त करणं आयोजकांना चांगलंच महागात पडणार आहे. गौतमी पाटीलच्या सुपारीच्या दुप्पट रक्कम त्यांना द्यावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात