• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • गौतमी देशपांडे घेतेय ट्रेकिंगचा आनंद; सुंदर Reel शेअर करत जिंकलं चाहत्यांचं मन

गौतमी देशपांडे घेतेय ट्रेकिंगचा आनंद; सुंदर Reel शेअर करत जिंकलं चाहत्यांचं मन

गौतमी देशपांडे 'माझा होशील ना' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर- 'माझा होशील ना'(Maza Hoshil Na) मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) घराघरात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेने आपला निरोप घेतला आहे. मात्र अजूनही ही मालिका आणि हे कलाकार चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. मालिकेने निरोप घेतल्याने गौतमीला थोडी उसंत मिळाली आहे. त्यामुळे सध्या गौतमी सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकताच गौतमीने ट्रेकिंगचा(Trekking Reel) एक सुंदर रील आपल्यासोबत शेअर केला आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या आपला मोकळा वेळ एन्जॉय करत आहे. ती सतत विविध फोटोशूट करताना तसेच फेरफटका मारताना दिसत आहे. नुकताच गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर रील शेअर केला आहे. यामध्ये ती एका निसर्गरम्य ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेत आहे. ''तेरी मेरी गल्ला होगी मशहूर' या गाण्यावर अप्रतिम रील बनवला आहे. यामध्ये गौतमी ब्लॅक टी शर्ट आणि ब्लु शॉर्ट डेनिममध्ये खूपच भारी दिसत आहे. गौतमीच्या लूकपासून, तिनं रीलसाठी निवडलेल्या गाण्यापर्यंत चाहत्यांना सर्वच गोष्टी फार आवडल्या आहेत. इतकंच नव्हे तर गौतमी असलेलं ठिकाणही अनेकांच्या मनात भरलं आहे.व्हिडीओमध्ये अगदी सकाळची वेळ दिसत आहे आणि त्याठिकाणी धुकंसुद्धा पडलेलं दिसत आहे. एकंदरीतच वातावरण खूपच सुंदर बनलं आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. (हे वाचा:Indian Idol 12: मराठमोळ्या सायली कांबळेने खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली) गौतमी देशपांडे 'माझा होशील ना' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. याआधीही तिने काही मालिका केल्या आहेत. मात्र तिला या मालिकेने खरी ओळख मिळवून दिली आहे. मालिकेत गौतमीने सईची भूमिका साकारली होती. तसेच मालिकेतील सई आदित्यची जोडी चाहत्यांना फार पसंत पडली होती. मामांच्या मायेमध्ये वाढलेला आदित्य तर दुसरीकडे आई बाबांची एकुलती एक हट्टी, लाडकी मात्र वेळेनुसार समजूतदार झालेली सई यामध्ये पाहायला मिळाली होती. फक्त पुरुषांनी भरलेल्या घरात सईसारखी गोड मुलगी जाऊन त्यांना आई, बहीण, मुलगी,सून सर्वांची माया देते. असं मालिकेत पाहायला मिळालं होतं. मालिकेने काही दिवसांपूर्वी आपला निरोप घेतला आहे. मात्र अजूनही सई-आदित्यच्या जोडीची क्रेझ कायम आहे. (हे वाचा:'अशी ही बनवाबनवी'ची ३३ वर्षे पूर्ण; स्वप्नील जोशीने लिहिली खास पोस्ट) गौतमी देशपांडे सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. गौतमी ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. या दोघी बहिणी सतत आपल्याला सोशल मीडियावर भेटत असतात.
  Published by:Aiman Desai
  First published: