मुंबई, 09 ऑक्टोबर : अभिनेत्री सुष्मिता सेन ‘आर्या’ या वेबसीरीजच्या तुफान यशानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘ताली’ या वेब सीरिजचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर श्रीगौरी सावंतची भूमिका सुष्मिता साकारणार आहे. गौरी सावंत ही अनेक वर्ष ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काम करत आहे. अनेक सामाजिक कार्यात तिचा सहभाग असतो. सेक्स वर्करसाठीही गौरी सावंत महत्त्वाचं काम करत आहे. जवळपास 500 हून जास्त ट्रान्सजेंडर्सना गौरी सावंत एकत्र आणले आहेत. अशा गौरी सावंतच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता श्रीगौरी यांनी ‘ताली’ या वेब सिरीजवर त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. . गौरी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सुष्मिता सेन आणि निर्माती आफिफा नाडियादवालासोबत दिसत आहे. गौरीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही मुळात महिला आहोत… तुम्ही माझे पात्र साकारणार आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या समाजासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. तुझ्या धैर्याला मी सलाम करते.’ हेही वाचा - Bus Bai Bus: ‘अगं किती साधी दिसतेस’; सोनाली कुलकर्णीने सांगितला तो मास्कचा किस्सा गौरीच्या या पोस्टवर सुष्मिता सेननेही प्रतिक्रिया दिली आहे. सुष्मिताने लिहिले कि , ‘तूच खरी शक्ती गौरी आहेस. तुम्ही आणि तुमच्या समुदायाबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर आहे.’ गौरी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. चाहते सुष्मिता सेनला या आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
6 ऑक्टोबर रोजी सुष्मिता सेनने ‘ताली’ या वेब सीरिजमधील तिचा लूक शेअर केला होता. यामध्ये यामध्ये अभिनेत्री ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपलं कलाकौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. सुष्मिताने यामध्ये साडी नेसलेली असून, कपाळावर मोठा टिळा लावलेला आहे. दरम्यान सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या तालीचं पहिलं पोस्टर रिलीज होताच गौरी सावंतनं सांगितलं होतं कि, ‘‘एका हिजड्याची भूमिका विश्व सुंदरी करणार आहे ही आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. सुष्मिता सेन या भूमिकेला पुरेपूर न्याय देईल असं मला वाटतं. जर कोणी मोठ्या अभिनेत्यानं माझं काम केलं असतं कर ते फार फनी वाटलं असतं.’’
‘ताली’ या मालिकेत सुष्मिता सेनसोबत ‘आर्य’ फेम अंकुर भाटियाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस या वेब सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. या मालिकेचे पहिले शेड्युल पुण्यात सुरू आहे.