जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bus Bai Bus: 'अगं किती साधी दिसतेस'; सोनाली कुलकर्णीने सांगितला तो मास्कचा किस्सा

Bus Bai Bus: 'अगं किती साधी दिसतेस'; सोनाली कुलकर्णीने सांगितला तो मास्कचा किस्सा

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमात नुकतीच सोनाली कुलकर्णीनं हजेरी लावली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली असून अनेक गुपितं, जुने किस्से, मजेशीर गप्पा मारलेल्या पहायला मिळाल्या. नुकतंच या कार्यक्रमात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं हजेरी लावली. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘बस बाई बस’च्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात सोनालीने अनेक गप्प गोष्टी केल्या, अनेक किस्सेही सांगितले. सोनालीनं यावेळी मास्कमुळे बराच फायदा झाल्याचं सांगितलं. सोनाली म्हणाली, मास्क आल्यावर मला खूपच आनंद झालाय. कारण बरं वाटतं मेकअप वगैरे करायला लागत नाही. नाहीतर इतके हक्कानं लोकं रागावतात की, ‘अगं किती साधी दिसतेस’. अशाही कमेंट्स मिळतात.

जाहिरात

सोनालीनं मिमिक्री केल्यावर कसं वाटतं याविषयी सांगितलं. ‘माझी मिमिक्री केल्यावर मला खूप मजा येते. कारण मला माझी मिमिक्री झाल्यावर कळालं की अच्छा मी असं बोलते’. सोनालीचे या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोनालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी ते हिंदीपर्यंतचा प्रवास केला आहे. तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात