नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडीचा बहुप्रतीक्षित ट्रेलर (Gangubai Kathiawadi official Trailer) लाँच झाला आणि त्यात आलिया भट्टने (Alia Bhatt as Gangubai) केलेल्या गंगुबाईचा कडक अवतार दिसला. त्याबरोबर विजय राजची जबरदस्त जुगलबंदी या सिनेमात दिसणार हे ट्रेलरवरून स्पष्ट झालं आहे. ''आजाद मैदान में गंगुबाई ने भाषण देते वक्त आखें मिला कर अपने हक की बात की है," असं सांगत स्वतःच्याच गुर्मीत जगणारी कणखर गंगुबाई दिसते, त्याच वेळी तिने भोगलेल्या नरक यातनांची जाणीव तिच्या डोळ्यातून दाखवण्यात आलिया यशस्वी झाल्याचंही ट्रेलरवरून दिसतं.
गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात संजय लीला भन्साळीने 60 च्या दशकात मुंबईच्या कामाठीपुराची अनभिषिक्त सम्राज्ञी असलेल्या गंगुबाईचं आयुष्य चितारलं आहे. मुंबईची पहिली माफिया क्वीन असंही गंगुबाईचं वर्णन केलं जातं.
मधुबाला यांच्या बहिणीबद्दल समोर आली शॉकिंग न्यूज! सुनेनं घरातून बाहेर...
मुळात गुजरातच्या काठियावाड भागातून अगदी तरुणपणी मुंबईत पोहोचलेल्या गंगुबाईला फसवणूक करून वेश्याव्यवसायात आणलं गेलं आणि नंतर तिने या व्यवसायावर राज्य केलं. तिने आपल्या ताकदीचा आणि राजकीय संबंधांचा वापर करून शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचा प्रयत्न केला. तिचीच कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
गंगुबाईच्या ट्रेलरमधली आणखी एक विशेष बाब म्हणजे अजय देवगणचा लुक. अजय देवगण या सिनेमात कॅमिओ साकारत आहे. छोटी पण महत्त्वाची भूमिका करणाऱ्या अजय देवगणचा लुकसुद्धा ट्रेलरमधून समोर येतो. लालाच्या भूमिकेला अजय देवगण न्याय देणार, हे या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’चं जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी अभिनयाचं कौतुक करायला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood, Gangubai kathiawadi, Trailer