Home /News /entertainment /

संजय लीला भंसाळी आणि आलिया भट्टविरोधात न्यायालयात खटला; वाचा काय आहे कारण

संजय लीला भंसाळी आणि आलिया भट्टविरोधात न्यायालयात खटला; वाचा काय आहे कारण

गंगुबाई काठियावाडी (Gangubai kathiawadi) हा सिनेमा ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावरुन साकारण्यात आला आहे. हुसेन जेदी यांनी हे पुस्तक लिहीलं आहे.

  मुंबई, 23 डिसेंबर: संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) यांचा नवा चित्रपट 'गंगूबाई काठियावाड़ी' (Gangubai Kathiawadi) बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रदर्शनाच्या आधीच हा सिनेमा वादात सापडला आहे. गंगूबाईचा कुटुंबाने आलिया भट्ट (Alil Bhatt) आणि संजय लीला भन्साळींविरोधात बॉम्बे सिव्हील कोर्टात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटाच्या कथेवर गंगूबाईच्या कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्टविरोधात हुसेन जैदी नावाच्या एका व्यक्तीने मंगळवारी याचिका दाखल केली आहे. या कलाकारांना 7 जानेवारी 2021 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावरुन बवनण्यात आला आहे. हुसेन जेदी यांनीच हे पुस्तक लिहीलं आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादात अडकल्याने निर्माते आणि दिग्दर्शकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गंगूबाई 60 च्या दशकातील मुंबई माफियांतील एक मोठं नाव होतं. तिला तिच्या पतीने अवघ्या 500 रुपयांत विकलं होतं.  तेव्हापासून ती वेश्या व्यवसायात अडकली होती. गंगूबाईने असहाय्य मुलींसाठी बरीच कामंही केली होती. या चित्रपटाच्यानिमित्ताने आलिया भट आणि संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या भूमिकेसाठी सुरुवातीला प्रियांका चोप्राला विचारण्यात आलं होतं. पण तिनी नकार दिल्यानं आलियाला ही भूमिका मिळाली.
  आलिया सध्या या चित्रपटाचे शूटिंग करत असून नुकताच तिचा सडक 2 हा चित्रपट ऑनालइन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून विरोध करण्यात आला होता. त्याचबरोबर आलिया करण जोहरच्या ब्रह्मास्त्र या सिनेमातही दिसणार आहे. अयान मुखर्जी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Alia Bhatt, Sanjay Leela Bhansali

  पुढील बातम्या