मुंबई 26 जुलै: एखाद्या विषयाची पूर्ण माहिती न घेता आपलं मत व्यक्त करणं हा प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. या कारणामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) देखील सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल होतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घडला आहे. भारतीय कुस्तीपटू (Indian Wrestler) प्रिया मलिकने (Priya Malik) हंगेरीतील बुडापेस्ट (Budapest) येथे सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Cadet Wrestling Championship) घवघवीत यश मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. परंतु, काही जणांना तिने हे यश जपानमधील टोकियो येथे सध्या सुरु असलेल्या ऑलिंपिकमध्ये मिळवले असल्याचं वाटलं. याबाबत पुरेशी माहिती न घेता सोशल मीडियावर टोकियो ऑलिंपिकचा (Tokyo) उल्लेख करत प्रियाचं अनेकांनी अभिनंदन केलं. विशेष म्हणजे यात बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि अभिनेता वत्सल शेठ (Vatsal Sheth) यांचा समावेश होता.
‘हा चित्रपट शहिदांना खरी श्रद्धांजली’; ‘Shershaah’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील भावुक
हंगेरीत सध्या वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत प्रिया मलिकने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. त्यानंतर तिच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. नेटिझन्सने देखील सोशल मिडीयावरुन प्रिया शुभेच्छा देत तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र तिने हे यश हंगेरीतील स्पर्धेत मिळवले मात्र, याबाबत काही जण अनभिज्ञ होते. त्यांना वाटले की सध्या जपानमध्ये सुरु असलेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रियाने हे यश मिळवले आहे आणि त्यांनी तोच संदर्भ घेत तिचे सोशल मिडीयावर पोस्ट टाकत अभिनंदन केले. यात बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता वत्सल शेठ यांचा समावेश होता. या दोघांनी प्रियाचे अभिनंदन करण्यासाठी पोस्ट टाकताना चुकून टोकियो ऑलिंपिकचा उल्लेख केला. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियात टीका होत आहे.
भीती प्रत्येकाला वाटतेय! ‘ती परत आलीये’च्या नव्या ट्रेलरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
हंगेरीतील वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 73 किलो वजनगटात प्रिया मलिकने बेलारुसची (Belarus) कुस्तीपटू केस्निया पट्टापोव्हिच हिचा 5-0 ने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने 49 किलो वजन गटात रौप्य पदक पटकावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियाने हे यश हंगेरीतील स्पर्धेत मिळवले. प्रियाच्या या यशाबद्दल तिचे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सारा अली खान या दोघींनीही सोशल मिडीयावर पोस्ट टाकत अभिनंदन केले. याच दरम्यान भूमी पेडणेकरने प्रियाचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. परंतु, त्यात चुकून टोकियो ऑलिंपिकचा उल्लेख केला. सध्या भूमी अभिनेता राजकुमार राव सोबत बधाई हो या चित्रपटाचा आगामी सिक्वेल बधाई दो मध्ये भूमिका करत आहे. तसेच आगामी रक्षा बंधन या चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमार समवेत दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.