ब्रिटन, २७ एप्रिल- भारतात हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सीजे ड मुईचं नाव अनेकांना माहीत नसेल. पण त्याच्या नावाभोवती मोठं वलय आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तो कधीही बरा न होणाऱ्या आजाराशी लढा देत आहे. याबद्दल इतर कोणी नाही तर स्वतः त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून पूर्ण माहिती दिली. मुई याने ट्वीट करत म्हटलं होतं की, त्याला एड्स हा आजार झाला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्याजवळ फार वेळ शिल्लक नसून लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल त्याने साऱ्यांचे आभार मानले आहेत. ‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता…’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया मुईकडे पाहिलं की कोणालाही हे खरं वाटणार नाही की गेल्या ३० वर्षांपासून तो या आजाराशी लढा देत आहे. आता तो या आजाराच्या शेवटच्या पातळीवर पोहोचला आहे. एकीकडे शरीर साथ देत नाही हे माहीत असतानाही मुईने जगण्याची आस सोडलेली नाही. तो आताही व्यायाम करून शरीर तंदुरुस्त कसं ठेवता येईल याकडे जास्त लक्ष देतो. ट्विटरवर धावतानाचे आणि व्यायाम करतानाचे अनेक फोटो शेअर करतो.
आता सलमान खानशी भिडणार आलिया आणि रणबीर कपूर दुर्दम्य आजारामुळे त्याने जगण्याची आस सोडली हा संदेश मुईला आपल्या चाहत्यांना द्यायचा नाहीये. त्यामुळेच तो सर्वतोपरि आनंदी आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतो. मुईने जेव्हा त्याच्या आजाराबद्दल ट्विटरवर सांगितलं होतं, तेव्हा अनेकांनी त्याला मदतीचा हात पुढे केला होता. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, त्याच्या पेजवर आतापर्यंत ३ हजार पाउंड्सपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे. मुई हेही म्हणाला की, ‘माझी कोणाला मदत होणार असेल तर नक्की सांगा.’ …म्हणून एवेंजर्स सिनेमा संपण्याच्याआधीच थिएटरमधून बाहेर पडले सुशांत सिंग राजपूत मुईला ब्रिटनच्या एगहेड्स या क्विज शोमधून लोकप्रियता मिळाली होती. त्याने फिफ्टीन टू वन आणि काउंटडाउनसारखे शोही केले आहेत. तसेच २०१० मध्ये झालेल्या वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांशी त्याने पैज लावली होती. यावेळी त्याने सगळ्या फेऱ्या जिंकल्या होत्या. एवढंच नाही तर सीजे मुई १९९० ते २००९ पर्यत चेस क्लब प्लेअरही होता. पण सध्या त्याला पैशांची तंगी जाणवत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्याच्याकडे दमडीही नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. याचमुळे तो लवकर बेघरही होऊ शकतो. VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून