मुंबई, 5 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना गोंडस परीदेखील झाली. असे असले तरी, अनुष्काच्याआधी विराटचे खासगी आयुष्य कसे होते, त्याने कोणा कोणाला डेट केलं याची चर्चा नेहमी सुरु असतेच. विराट आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच विराटची Ex गर्लफ्रेंडची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली आहे.
विराट अनुष्काआधी ब्राझीलच्या मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लिटे डेट करत होता. विराट आणि इसाबेल यांच्या डेटच्या खूप चर्चाही रंगल्या होत्या.
ब्राझिलियन मॉडेल इजाबेल लिटे (Izabelle Leite) ही विराटच्या प्रेमात वेडी होती, असं म्हटलं जातं. इजाबेल लिटे आणि विराट सिंगापूरमध्ये अनेकदा सोबत आढळले होते. इजाबेलने 2012 साली आमिर खानच्या तलाश या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र काही काळानंतर इजाबेल-विराट यांचं ब्रेकअप झालं होतं.
हँडसम विराटने मिस इंडिया फेमिना पुरस्कार विजेत्या सारा जेन डायसलाही (Sarah Jane Dias) डेट केलं होतं. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघे वेगळे झाले.
बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. (Tamannaah bhatia) तिलाही विराटने डेट केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विराट आणि तमन्ना भाटिया यांनी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं. तेव्हा ते एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचं नातं जास्त दिवस टिकू शकलं नाही.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री संजना गलरानी (Sanjjanaa Galrani) आणि विराट रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चादेखील रंगली होती. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. संजना आणि विराट या दोघांचं अफेअर होतं; मात्र या दोघांनी कधीच आपल्या नात्याविषयी कबुली दिली नव्हती. त्यांच्या अफेअरची प्रचंड चर्चा झाली. पण त्यानंतर त्यांचं ब्रेकअपदेखील झालं.
अभिनेत्री साक्षी अग्रवाल (Sakshi Agarwal) आणि विराट कोहली यांचंही अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या; मात्र त्यांचं अफेअरही जास्त दिवस टिकलं नाही. काही दिवसांमध्येच ते एकमेकांपासून वेगळे झाल्याचं म्हटलं गेलं होतं.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट 2013 मध्ये भेटले होते जेव्हा दोघे एका शॅम्पूची जाहिरात करत होते. इथून दोघांनी डेटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना वामिका नावाची मुलगी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Love, Virat kohli