जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / फटाके उडवताना अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल तुमचीही घाबरगुंडी

फटाके उडवताना अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल तुमचीही घाबरगुंडी

फटाके उडवताना अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल तुमचीही घाबरगुंडी

दिवाळीच्या (Diwali 2021) निमित्ताने सामान्य माणूसच नव्हे तर सिनेतारकाही उत्साहात आहेत. बॉलीवूड स्टार्ससोबतच भोजपुरी स्टार्सही दिवाळीत धमाल करत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते त्यांच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत. पण या सगळ्यामध्ये सर्वात धक्कादायक व्हिडिओ भोजपुरी (Bhojpuri Actress) अभिनेत्री राणी चॅटर्जीचा (Rani Chattergee) आहे. जो पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 नोव्हेंबर- दिवाळीच्या  (Diwali 2021)  निमित्ताने सामान्य माणूसच नव्हे तर सिनेतारकाही उत्साहात आहेत. बॉलीवूड स्टार्ससोबतच भोजपुरी स्टार्सही दिवाळीत धमाल करत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते त्यांच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत. पण या सगळ्यामध्ये सर्वात धक्कादायक व्हिडिओ भोजपुरी  (Bhojpuri Actress)  अभिनेत्री राणी चॅटर्जीचा  (Rani Chattergee)  आहे. जो पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ  (Viral Video)  पाहून असं वाटत आहे की राणी चॅटर्जी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे.

जाहिरात

अभिनेत्री राणी चॅटर्जीने तिच्या दिवाळीच्या रात्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती दिवाळीचे क्रॅकर्स जाळताना दिसत आहे. राणीने स्लीव्हलेस ड्रेस घातला असून खुल्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिने काल तिचे खूप सुंदर फोटोही शेअर केले होते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. या स्लो-मोशन व्हिडिओमध्ये राणी क्रॅकर्सचा आनंद घेताना दिसत आहे. बराच वेळ एका फटक्याला आग लागत नाही, पण अचानक त्यातून आगीच्या ज्वाला उठू लागतात आणि ठिणगी पडण्याऐवजी तो फटका फुटतो. राणी ताबडतोब तिथून मागे हटते आणि कॅमेरामनही लडखडतो. काजल राघवानीची प्रतिक्रिया- हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये असला तरी फटाक्याच्या फुटण्याच्या तीव्रतेचा अंदाज लावता येत नाहीय. मात्र या अपघाताचा व्हिडीओ खूपच भयावह आहे. हे पाहून केवळ राणीचे चाहतेच नव्हे तर बॉलिवूडचे इतर सेलिब्रिटीही घाबरले आहेत. अभिनेत्री काजल राघवानीने धक्कादायक इमोजी पोस्ट करून आश्चर्य व्यक्त केलं आहे. राणीचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. व्हिडिओसोबत, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहलं, - “काल हे घडले. मी आणि समीर वाचलो पण मित्रांनो कृपया सुरक्षित रहा’. (हे वाचा: नुसरत जहाँनं यशदास गुप्तासोबत केलं Twinning! लेकासोबत साजरी केली पहिली दिवाळी ) या भोजपुरी चित्रपटात झळकणार अभिनेत्री- दोन दिवसांपूर्वी राणी चॅटर्जीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त भोजपुरी स्टार्सनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. राणी चॅटर्जी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो लोकांना आवडतात. गेल्या महिन्यात तिने भोजपुरी चित्रपट ‘मेरा पती मेरा देवता है’चे शूटिंग करत असल्याची माहिती दिली होती. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू शेखर चौधरी यांनी केली असून अजय कुमार झा याचं दिग्दर्शन करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात