• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार

‘पॉर्न करण्यासाठी भाग पाडलं’; अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार

पॉर्न तयार करणारी आणखी एक टोळी गजाआड; अभिनेत्रींवर करायचे जबरदस्ती

 • Share this:
  मुंबई 27 जुलै: राज कुंद्राला अटक झाल्यामुळे भारतातील पॉर्नोग्राफी इंडस्ट्रीचे दाबे दणाणले आहेत. (Raj Kundra Pornography Case) अन्यायग्रस्त अनेक तरुणी स्वत:हून समोर अशा मंडळींविरोधात आवाज उठवत आहेत. दरम्यान कोलकातामधील असंच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अभिनेत्रीला वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करण्यास भाग पाडण्यात आलं. शिवाय तिचे व्हिडीओ पॉर्न वेब साईट्सवर व्हायरल देखील करण्यात आले. या प्रकरणी तिने आता पोलीस तक्रार केली आहे. तरुणीची पोलिसांत धाव; KRK वर केला बलात्काराचा आरोप आज तकने दिलेल्या वृत्तानुसार सर्व प्रथम फेसबुकवरून या तरुणीशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर तिला ऑडिशनसाठी बोलावलं आणि तिच्याकडून साडीची जाहिरात करून घेतली. यासाठी तिला साडेतीन हजार रूपये देखील देण्यात आले. त्यानंतर तिला एका वेब सीरिजची ऑफर दिली. ही ऑफर अभिनेत्रीने स्वीकारली. परंतु सेटवर पोहोचताच तिला ही कुठलीही सीरिज नसून पॉर्न व्हिडीओ असल्याचं लक्षात आलं. परिणामी या अभिनेत्रीनं काम करण्यात नकार दिला. मात्र मेकर्सने तिच्याकडून जबरदस्तीने पॉर्न व्हिडीओ शूट करून घेतले. हे व्हिडीओ कुठल्याही पॉर्न वेब साईट्सवर अपलोड होणार नाहीत असं आश्वासन तिला देण्यात आलं होतं. परंतु निर्मात्यांनी हे व्हिडीओ पॉर्न साईट्सला विकले. सध्या ते इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. परिणामी हे व्हिडीओ रिमूव्ह व्हावे यासाठी अभिनेत्रीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. राज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका अभिनेत्रीने या प्रकरणी कोलकातामधील न्यूटाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने मोइनाक आणि नंदिदा दत्त या दोघांची नाव घेतली आहे. तक्रार होताच हे दोघंही फरार झाले. सध्या पोलीस या दोघांचा तपास करत आहेत. या तरुणीला नक्कीच न्याय मिळेल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: