Home /News /entertainment /

राज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका

राज कुंद्रा तुरुंगातच राहणार; कोर्टानं फेटाळली याचिका

राज कुंद्राची याचिका कोर्टाने फेटाळली; सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    मुंबई 27 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography Case) दररोज नव्या तरुणी, मॉडेल अभिनेत्री समोर येत राजची पोलखोल करत आहेत. शिवाय त्याच्या ऑफिसमधून पोलिसांच्या हाती काही संशयास्पद पुरावे देखील लागले आहेत. त्यामुळे कोर्टाने राज कुंद्राच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे. राजला आता आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. दरम्यान त्याने जामिन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. परिणामी आता त्याची आणखी कसून चौकशी केली जाणार आहे. तरुणीची पोलिसांत धाव; KRK वर केला बलात्काराचा आरोप राज कुंद्राने परिनाम लॉ असोसिएट्सच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. ज्या कलमांखाली अपल्याला अटक करण्यात आलीय त्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते असाही उल्लेख त्याने यामध्ये केला होता. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत आपल्याला असाप्रकारे कायदा आणि नियमांचे पालन न करता पोलीस कोठडीत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे या याचिकेत म्हटलं होतं. तसेच करोनाचेही कारण या याचिकेमध्ये देण्यात आलं होतं. मात्र त्याची ही याचिका कोर्टानं पूर्णपणे फेटाळून लावली. उलट त्याच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली. ‘राज कुंद्राने मला ऑफर का दिली नाही?’ अभिनेत्रीचा शिल्पा शेट्टीला सवाल कार्यालयावर छाप्यात सापडला बराच डेटा मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अंधेरी पश्चिमेमध्ये असणाऱ्या राज कुंद्रांच्या वियान कंपनीच्या कार्यालयामध्ये छापा टाकून तेथून मोठ्या प्रमाणात डिजीटल पुरावे ताब्यात घेतले होते. या छाप्यामध्ये तपास यंत्रणांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात माहिती आणि साहित्य सापडलं होतं. हा डेटा काही टेराबाईट्समध्ये आहे यावरुनच या छाप्यामध्ये पोलिसांना तपासासाठी आवश्यक असणारे पुढील धागेदोरे सापडल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Porn video, Raj kundra

    पुढील बातम्या