Home /News /entertainment /

तरुणीची पोलिसांत धाव; KRK वर केला बलात्काराचा आरोप

तरुणीची पोलिसांत धाव; KRK वर केला बलात्काराचा आरोप

केआरके एका मोठ्या संकटात अडकला आहे. एका तरुणीनं त्याच्यावर चक्क बलात्काराचा आरोप केला आहे.

    मुंबई 27 जुलै: अभिनेता, समिक्षक कमाल आर. खान (KRK) उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसोबत तो सतत पंगा घेताना दिसतो. यामुळे अनेकदा त्याला ट्रोल देखील केलं जातं. (Model accused KRK of Rape) मात्र यावेळी केआरके एका मोठ्या संकटात अडकला आहे. एका तरुणीनं त्याच्यावर चक्क बलात्काराचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोप करणारी तरुणी एक फिटनेस मॉडेल आहे. तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये केआरके विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. या तरुणीच्या FIR ची कॉपी सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. केआरके सध्या दुबईमध्ये आहे. त्याने अद्याप या प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या प्रकराची कसून चौकशी करत आहेत. ‘राज कुंद्राने मला ऑफर का दिली नाही?’ अभिनेत्रीचा शिल्पा शेट्टीला सवाल राज कुंद्राला अटकेची आधीच लागली होती चाहूल; काही दिवसांपूर्वीच बदलला होता फोन, पाहा काय होता प्लॅन बी यापूर्वी केआरके एका व्हिडीओमुळे चर्चेत होता. पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी 25 लाखांची मागणी करत असतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कलाकारांना तो ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. “नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक ऑडियो क्लिप सादर करत मोठा खुलासा करणार आहे. इथे मी एका खूप मोठ्या ब्लॅक मेलरविषयी बोलत आहे. नेगेटिव्ह पब्लिसिटी न करण्यासाठी पैसे घेतो.” असं म्हणत निर्माता रोहित चौधरीने ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Crime, Rape case

    पुढील बातम्या