Home /News /entertainment /

‘राज कुंद्राने मला ऑफर का दिली नाही?’ अभिनेत्रीचा शिल्पा शेट्टीला सवाल

‘राज कुंद्राने मला ऑफर का दिली नाही?’ अभिनेत्रीचा शिल्पा शेट्टीला सवाल

राज कुंद्रानं मला अशा वेब सीरिजची ऑफर का दिली नाही? असा सवाल तिने शिल्पा शेट्टीला केला आहे.

  मुंबई 27 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography Case) सतत राजविरोधात विविध प्रकारचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत भाष्य केलं. राज कुंद्रानं मला अशा वेब सीरिजची ऑफर का दिली नाही? असा सवाल तिने शिल्पा शेट्टीला केला आहे. पाहूया नेमकं काय म्हणाली राखी सावंत? राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी ती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “तुमच्या दुकानात जर पिझ्झा मिळाला तर मी पिझ्झा खरेदी करेन. जर वडापाव मिळाला तर वडापाव खरेदी करेन. ज्या मुली भारतीय नारी होण्याचा आव आणतात त्या खऱ्या आयुष्यात तशा नसतात. त्यांची पार्श्वभूमी एकदा चेक करा मग तुम्हाला कळेल. उगाचच लोकांना आरोप करण्यात काही अर्थ तुम्ही तशा आहात म्हणूनच तुम्हाला असे रोल ऑफर केले जातात. राज कुंद्रानं मला अशा वेब सीरिजची ऑफर का दिली नाही? कारण मी फरफॉर्मर आहे. अभिनेत्री आहे. म्हणून मला अश्लील चित्रपटांच्या ऑफर मिळत नाही.” राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘Porn नव्हे nude film तयार करायचो’; राज कुंद्राच्या साथीदाराचा अजब दावा
  Pornography प्रकरणी Sherlyn-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Crime, Porn video, Raj kundra, Rakhi sawant

  पुढील बातम्या