अमोल पालेकर आणि बरुण सोबतीसह स्क्रीन शेअर करणार रिंकू राजगुरु; 100 नंतर दिसणार 200 मध्ये!
त्यामुळे पोलिस कधीही आपली चौकशी करू शकतात याची कुणकुण राजला होती. त्यामुळे त्याने आधीच प्लॅन बीची योजणा केली होती. 19 तारखेला राजला अटक झाली. त्याच्यासोबतच आणखी 11 लोकांना अचक झाली होती. त्यातील काहींची चौकशीनंतर सुटका झाली. तर काही अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत. या सगळ्या गोष्टी आधीच लक्षात येताच मार्च महिण्यातच राजने त्याचा जुना फोन बदलला होता. जेणेकरून पोलिसांना त्यातील कोणताही डेटा मिळाणार नाही. राजला जेव्हा त्याच्या आधीच्या फोनविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने त्याने तो फोन फेकून दिला असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांना संशय आहे की,त्या फोनमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पुरावे होते, ज्यामुले राजने तो फोन फेकून दिला. याशिवाय पोलिस आता राज आणि शिल्पा यांच्या फायन्शियल अकाउंटची तपासणी करण्यासाठी, फायनान्शियल ऑडीटरची नियक्ती करणार आहे. राज हॉटशॉट आणि बॉलिफेम नावाच्या अँपवरून मिळणारा पैसा वेगवेगळ्या देशांतील अकाउंट्समध्ये ट्रान्सफार करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty