मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Big Boss Marathi 4: अपूर्वा आणि प्रसादमध्ये खडाजंगी, “…म्हणून मला त्याच्यासोबत'

Big Boss Marathi 4: अपूर्वा आणि प्रसादमध्ये खडाजंगी, “…म्हणून मला त्याच्यासोबत'

अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे

अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे

बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय असून हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची लोक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून कालपासून ‘बिग बॉस मराठी’चा चौथ्या पर्वाला सुरुवात झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय असून हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची लोक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून कालपासून ‘बिग बॉस मराठी’चा चौथ्या पर्वाला सुरुवात झाली. अगदी धमाकेदार अंदाजात 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली. आज बिग बॉस मराठी सीझन 4 चा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

प्रोमोवरुन पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले. पहिल्याच दिवशी गटातील चारही सदस्यांना कोणता खेळाडू निरुपयोगी आहे? हे ठरवायला सांगितलं. मग काय वादाची ठिणगी तर पडणारच होती. अपूर्वाने तिचे मत सांगायला सुरुवात केली पण कुठेतरी ते प्रसादला पटलं नाही आणि त्यांच्यात मतभेद असल्याचं दिसून आले. अपूर्वाचे म्हणणे आहे, हा कुस्तीचा खेळ नव्हे, आणि तुला असं का वाटतं कि तू (योगेश जाधव) त्याच्यापेक्षा बेटर आहेस?. अपूर्वा यावरून प्रसादवर भडकली “तू बोलू देणार आहेस का मला कि स्वतः एकटाच बोलणार आहेस ?” आणि वाद वाढतच गेला

हेही वाचा -  Big Boss Marathi 4: 'मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये'; पहिल्याच दिवशी शेवंताचा घणाघात

प्रसाद म्हणाला, “तू बोलीस त्यावर मी उत्तर दिलं तुला मी फक्त फास्ट ऐकलं बाकी काही नाही”. त्यावर शब्दाला शब्द वाढतं गेला अपूर्वाचे म्हणणे पडले “तू बोल I Respected, आता शांतपणे मी काय बोलते ते पण ऐक...हा कुस्तीचा खेळ नसल्याने त्याच्या बॉडीवर त्याला जज करणं मला अत्यंत चुकीचं वाटतं, तो स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मला त्या स्ट्रॉंग स्पर्धकासोबत खेळायला जास्त आवडेल रॅदर दॅन तुझ्या अॅरोगन्सबरोबर. प्रसादला अपूर्वाचे हे म्हणणे पटले नाही, त्यावर तो म्हणाला “अॅरोगन्स वैगरे अजिबात बोलू नकोस”... अपूर्वा म्हणाली, बोटं खाली करून बोल माझ्याशी, मला बिग बॉस यांनी माझं मत विचारलं मी तुझ्याविरोधात मत दिले.”

दरम्यान, अपूर्वा आणि प्रसादमध्ये आज मत देण्यावरून कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे. या मुद्द्यावरून अपूर्वा आणि प्रसाद एकमेकांना जाब विचारताना दिसणार आहेत. आता कुठे पहिला दिवस आणि सदस्यांनी आपल्याविरोधात मत दिले हे त्यांना सहन होत नाहीये, पुढे टास्क सुरु झाल्यावर काय परिस्थिती होणार आहे?, किती वाद-विवाद बघायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Apurva nemlekar, Bigg boss, Bigg boss marathi, Marathi entertainment