Home /News /entertainment /

BREAKING: लाल महालात लावणी पडली महागात; नृत्यांगना वैष्णवी पाटील विरोधात गुन्हा दाखल

BREAKING: लाल महालात लावणी पडली महागात; नृत्यांगना वैष्णवी पाटील विरोधात गुन्हा दाखल

BREAKING: लाल महालात लावणी पडली महागात; नृत्यांगणा वैष्णवी पाटील विरोधात गुन्हा दाखल

BREAKING: लाल महालात लावणी पडली महागात; नृत्यांगणा वैष्णवी पाटील विरोधात गुन्हा दाखल

नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने लाल महालात (Lal Mahal) शूट केलेली लावणी ( Vaishnavi Patil Chandra Video) गेली अनेक दिवस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. परंतू तब्बल एक महिन्यानंतर वैष्णवीच्या लावणी रिलवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 21 मे : लाल महालात (Lal Mahal Lavni ) लावणी व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी नृत्यांगना वैष्णवी (Vaishnavi Patil) पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैष्णवीसह आणखी 2 जणांचा यात सहभाग आहे. पुण्याच्या फरासखाना (Faraskhana) पोलीस ठाण्यात वैष्णवी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 295 आणि 186 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीने 16 एप्रिल रोजी पुण्याच्या लाल महालात चंद्रमुखी (Chandramukhi) या सिनेमातील चंद्रा (Chandra Song) गाण्यावर लावणी शूट केली होती. वैष्णवीने शूट केलेली लावणी ( Vaishnavi Patil Chandra Video) गेली अनेक दिवस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. परंतू तब्बल एक महिन्यानंतर वैष्णवीच्या लावणी रिलवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला. लाल महाल शूटसाठी बंद ठेवण्यात आला असताना लावणी शूट करण्यात आल्याने नृत्यांगना वैष्णवी पाटील सह कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. माफी मागत वैष्णवीने म्हटलेय, 'पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागते'. हेही वाचा - सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral; ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री
लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत, असा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. कोण आहे वैष्णवी पाटील? वैष्णवी पाटील गेली अनेक वर्ष नृत्याचे धडे घेत आहे. वैष्णवी पुण्याची असून पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले आहे.  फार कमी वयात वैष्णवीने आपल्या नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  मराठी तसेच अनेक हिंदी टेलिव्हिजन शोमधून वैष्णवी समोर आली आहे. 'ढोलकीच्या तालावर' या शोमध्ये वैष्णवी विजेती झाली होती. यासारख्या अनेक मराठी शो, अवॉर्ड सोहळ्यातून तिने लावणी केली आहे. तसेच 'DID Little Masters'मध्ये वैष्णवी होती. इंडियास गॉट टॅलेंटमध्ये वैष्णवी फायनलीस्ट होती.  वैष्णवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अनेक नृत्याचे व्हिडीओ ती करत असते.
Published by:Minal Gurav
First published:

Tags: Marathi entertainment

पुढील बातम्या