महेश काळेने 5 वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर; चाहत्यांकडून केलं जातंय कौतुक

महेश काळेने 5 वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर; चाहत्यांकडून केलं जातंय कौतुक

महेश यांना 2015 साली त्यांच्या उत्तम कामगीरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि त्याचीच आठवण त्यांनी शेअर केली आहे.

  • Share this:

मुंबई 3 मे : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध शास्त्रीय (classical singer) गायक महेश काळे (Mahesh Kale) यांनी त्यांची एक जुनी आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. कोणताही पुरस्कार मिळालेला क्षण हा प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाचा असतो. असाच एक महत्त्वाचा क्षण गायक महेश काळेंच्याही आयुष्यात आला होता, तो म्हणजे (National Award) राष्ट्रीय पुरस्कार. महेश यांना 2015 साली त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि त्याचीच आठवण त्यांनी शेअर केली आहे.

'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusali) या 2015 साली आलेल्या चित्रपटातील गाण्यासाठी महेश काळेंना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘सूर निरागस हो’ (sur niragas ho) हे आजही तितकच लोकप्रिय आहे. श्रोत्यांनी या गाण्याला भरघोस प्रतिसाद दिला होता. तर चित्रपटही हिट ठरला होता. याच चित्रपटातील गायनासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. (Mahesh Kale shares memory)

हे वाचा - महाराष्ट्राबाहेर शूटिंग करताना काय त्रास होतो? मयुरी देशमुखनं सांगितला लॉकडाऊनमधील अनुभव

सोशल मीडियावर महेश यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तर त्यांनी लिहिलं आहे, "पाच वर्षांपूर्वी, तो दिवस, ते वर्ष." पोस्टमध्ये व्हिडीओत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार हे क्षण पाहायला मिळत आहेत. याशिवाय या पुरस्कार सोहळ्यात महेश यांनी त्यांच "सूर निरागस हो.." हे गाणंही मंचावर सादर केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Kale (@maheshmkale)

याशिवाय अनेक पुरस्कारांनी महेश यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सध्या ते ‘सुर नवा ध्यास नवा’ या कलर्स मराठी (Colors Marathi)  वरील कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. महेश यांच्या जगभरात अनेक कॉन्सर्टही (concerts) होतात. आजवर त्यांनी अमेरिका, इंग्लंड, युनायटेड अरब इमिरेट्स, ऑस्ट्रेलिया, युरोप, दक्षिण आशियायी देश या देशांत त्यांनी कॉन्सर्ट्स घेतल्या आहेत.

Published by: News Digital
First published: May 3, 2021, 8:41 PM IST

ताज्या बातम्या