जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठीच खुले’; Bold फोटोशूटमुळे फातिमा पुन्हा एकदा ट्रोल

‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठीच खुले’; Bold फोटोशूटमुळे फातिमा पुन्हा एकदा ट्रोल

‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठीच खुले’; Bold फोटोशूटमुळे फातिमा पुन्हा एकदा ट्रोल

आमिर-किरणच्या घटस्फोटाला फातिमा जबाबदार? सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 जुलै**:** आमिर खान किरण राव यांचा घटस्फोट झाल्यापासून अभिनेत्री फातिमा सना शेख प्रचंड चर्चेत राहू लागली आहे. (Aamir Khan Divorce Kiran Rao) तिच्यासाठीच आमिरने किरणला घटस्फोट दिला अशी अनेकांची समजूत आहे. त्यामुळे गेल्या काही काळात वारंवार तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (Fatima Sana Shaikh trolled) नुकतेच तिने काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. (Fatima Sana Shaikh Bold photoshoot) मात्र या फोटोंवर देखील काही नेटकऱ्यांनी आमिरबाबतच सवाल तिला केले आहेत. हे फोटो आमिर खानने काढले आहेत का? असे प्रश्न विचारत तिची खिल्ली उडवली जात आहे.

जाहिरात

वंदीची कमाल चंदाची धमाल; ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रींचा भन्नाट Dance Viral फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फातिमाने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. या फोटोंमध्ये फातिमा बोल्ड अंदाजात दिसत आहे. फातिमाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी फातिमाला ट्रोल केले आहे. “आमिरचे पूर्ण लक्ष हे तुझ्यावर आहे.”, “हिला कोणीतरी तुरुंगातून बाहेर काढा”, “एवढ्या सुंदर महिलेला इतका त्रास का देतात.” ‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठी खुले आहेत.”, “हे फोटो नक्कीच आमिर खानने काढले आहेत.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही खट्याळ नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. दरम्यान या ट्रोलिंगवर अद्याप तिने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘तयार राहा हा शेवटचा आहे…’; स्वीटूच्या नव्या फोटोंमुळे चाहते पडले गोंधळात

null

आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट**?** बॉलिवूड इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर आणि किरण हे दोघेही गेल्या काही वर्षात लग्न या संकल्पनेच्या पलिकडे विचार करत होते. त्यांच्यात कुठलेही वाद किंवा मतभेद नव्हते. परंतु आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र बदलला होता. त्यामुळे यापुढे केवळ मित्र म्हणूनच एकत्र राहू असा विचार त्यांनी केला. अर्थात ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नव्हती. त्यांना आपली मानसिक तयारी करायला जवळपास 2 वर्ष लागली. 2019 पासून ते विभक्त होण्याचा विचार करत होते. अखेर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात