मुंबई 19 जुलै**:** देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूस ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (Devmanus tv serial) या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. फोटो आणि गंमतीशीर व्हिडीओंच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. दरम्यान मालिकेतील वंदी आत्या आणि चंदा यांचा एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (dance video viral) या व्हिडीओमध्ये दोघंही भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. देवमाणूसमध्ये वंदी आत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पुष्पा चौधरी (Pushpa Chaudhari) यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या अभिनेत्री माधुरी पवारसोबत (Madhuri Pawar) भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दोघांनी चिकनी चिकनी पतली कमर ऐसे ना हिला या गाण्यावर गंमतीशीर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वंदी आत्या अशीच धम्माल करा अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत चाहत्यांची त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. ‘तयार राहा हा शेवटचा आहे…’; स्वीटूच्या नव्या फोटोंमुळे चाहते पडले गोंधळात
वनिता खरात कशी झाली हास्यक्वीन? त्या न्यूड फोटोमुळे उडवली होती खळबळ ‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.