जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आईमुळे झालं होतं नीना गुप्तांचं पहिलं ब्रेकअप; बसला होता जोरदार मार

आईमुळे झालं होतं नीना गुप्तांचं पहिलं ब्रेकअप; बसला होता जोरदार मार

आईमुळे झालं होतं नीना गुप्तांचं पहिलं ब्रेकअप; बसला होता जोरदार मार

नीना गुप्ता यांनी वयाच्या 15 वर्षी पहिलं अफेअर केलं होतं. अन् त्यामुळं त्यांना आईचा मार देखील खावा लागला होता. पाहूया काय होता तो किस्सा?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 3 जुलै**:** नीना गुप्ता या एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. 80-90च्या दशकात तर एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी होत असे. ‘साथ साथ’, ‘मंदी’, ‘लैला’, ‘स्वर्ग’, ‘बलवान’ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांद्वारे त्यांनी जवळपास दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नीना गुप्ता यांनी वयाच्या 15 वर्षी पहिलं अफेअर केलं होतं. अन् त्यामुळं त्यांना आईचा मार देखील खावा लागला होता. पाहूया काय होता तो किस्सा? उमेश कामतनं 8 वर्ष का केलं नाही कुठल्याही मालिकेत काम? सांगितलं खरं कारण नीना गुप्ता करोल बागमधील घर सोडून त्यांच्या नव्या घरी राहिल्या गेल्या होत्या. तेव्हा त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या. यावेळी शेजारीच राहणाऱ्या एका मुलाशी त्यांची पहिली भेट झाली. खरं तर सुरुवातीला त्यांच्यात काहीच बोलणं नव्हतं. त्याकाळी केवळ नजरे नजरेतून संवाद साधला जात असे. रस्त्यावरून जात असताना, मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना डोळ्याच्या कोपऱ्यातून ते दोघं एकमेकांशी संवाद साधायचे. एके दिवशी नीना आणि तो मुलगा गच्चीवर बोलत होते. दोघेही कुठल्यातरी विषयावर हसत असतानाच त्यांच्या आई तिथे पोहोचल्या. आईने नीना गुप्ता यांना ओढत घरात नेलं आणि त्यांना चांगलंच खडसावलं. अन् त्याच क्षणी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या अफेअरचा शेवट झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात