मुंबई 2 एप्रिल**:** अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्याचा चॉकलेट हिरो आहे. मुलीच्या त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. असा चॉकलेट हिरो आजारी पडला तर त्याची विशेष काळजी त्याच्या चाहत्यांना वाटणारच आणि त्यातूनही तो कोरोनाने आजारी असेल तर आणखीनच चिंता. असंच काहीसं कार्तिकही अनुभवतो आहे. आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटांत एक वेगळं स्थान निर्माण केलेल्या कार्तिकला कोरोनाची लागण झाली आहे. तो होम क्वारंटाइन आहे. पण तो औषधं घेऊन नाही तर टीव्ही क्विन एकता कपूरची (Ekta Kapoor) ‘कुमकुम भाग्य’ ही टीव्ही मालिका पाहून बरा होतो आहे. हे खुद्द कार्तिकनीच सांगितलंय. त्याचं असं झालं कार्तिकने कोरोना झाल्यानंतर त्याचा खाली डोकं वर पाय अशा पद्धतीचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्याला टॅगलाइन दिली होती की कोरोनानंतर सगळं जग उलटं दिसतंय. एकता कपूरने त्याच्या पोस्टवर लवकर बरा हो असं म्हटलं. त्याला कार्तिकनी रिप्लाय देताना लिहिलं, ‘घरी बसून कुमकुम भाग्य पाहतोय आणि आजारातून बरा होतोय.’ अवश्य पाहा - निक्कीनं केला आपल्या लव्ह लाईफचा खुलासा; उत्तर ऐकून टोनी कक्करलाही बसेल धक्का
एकता कपूरने कुमकुम भाग्य (KumKum Bhagya TV Serial) या टीव्ही सीरियलची निर्मिती केली असून त्यामध्ये अभिनेता शब्बीर अहलुवालिया आणि अभिनेत्री श्रीति झा हे मुख्य भूमिकेत आहेत. सीरीयल पाहून कार्तिकच्या तब्येतीत किती सुधारणा होत असेल माहीत नाही पण त्या मालिकेतल्या कलाकारांना आनंद नक्की झाला असेल. अवश्य पाहा - सोनम कपूरच्या गरुड अवताराची उडवली जातेय खिल्ली; अनोख्या फोटोशूटमुळं होतेय ट्रोल
कार्तिकने काही दिवसांपूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रँप वॉक केला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडवाणीही दिसली होती. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, ज्येष्ठ अभिनेता सतीश कौशिक यांचा समावेश होता. देशात कोरोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण जोरदार सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी, विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी लस घेतली. कार्तिक आता नेटफ्लिक्सच्या धमाका या चित्रपटात दिसणार आहे. भूलभुलैया 2 दोस्ताना 2 या चित्रपटांतही तो काम करतो आहे. कार्तिक सध्या खूपच व्यस्त असून चित्रपटांची शूटिंग जोरात सुरू आहेत. कोरोनामुळे त्याने विश्रांती घेतली असली तरीही बरा झाल्यावर तो जोमाने काम सुरू करेल. त्याचे चाहते त्याला नव्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्येही आहेत.

)







