मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Fathers Day 2020: या अभिनेत्रीला वडिलांनी दिला होता एकावेळी 4 बॉयफ्रेंड बनवण्याचा सल्ला

Fathers Day 2020: या अभिनेत्रीला वडिलांनी दिला होता एकावेळी 4 बॉयफ्रेंड बनवण्याचा सल्ला

अभिनेता राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शब्दांतून मांडले आहेत. पण यातील एक किस्सा लक्ष वेधून घेणारा आहे.

अभिनेता राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शब्दांतून मांडले आहेत. पण यातील एक किस्सा लक्ष वेधून घेणारा आहे.

अभिनेता राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शब्दांतून मांडले आहेत. पण यातील एक किस्सा लक्ष वेधून घेणारा आहे.

    मुंबई, 21 जून : अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khann) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. तिचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. दरम्यान आज फादर्स डे (Father's Day 2020) निमित्ताने तिने शेअर केलेली पोस्ट सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे. ट्विंकलने तिची वेबसाइट Tweak India वर फादर्स डे निमित्ताने तिचे वडील दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्याबाबतीत भरभरून लिहिले आहे. राजेश खन्नांबरोबरचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत या लिखाणाची लिंंक देखील तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या लेखामध्ये तिने राजेश खन्ना यांचे काही किस्से सांगितले आहेत, तसंच एक मुलगी म्हणून तिचे त्यांच्याबरोबरचे नाते कसे होते हे देखील तिने सांगितले आहे.

    (हे वाचा-Father Day 2020: 'तुम्ही माझं आयुष्य पूर्णपणे बदललं',करणचं मुलांसाठी हे खास पत्र)

    राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग ट्विंकलने शब्दांतून मांडले आहेत. पण यातील एक किस्सा लक्ष वेधून घेणारा आहे. तो म्हणजे ट्विंकल असं लिहिते की, 'मला माझ्या वडिलांनी तिला असं सांगितलं होती की कधी एकच बॉयफ्रेंड नको बनवू, नेहमी 4 बॉयफ्रेंड असू दे. म्हणजे तुझा प्रेमभंग होणार नाही. पण ते एकमेव होते ज्यांच्यामध्ये माझं हृदय तोडण्याची क्षमता होती.'

    इन्स्टाग्रामवर ट्विंकलने असं लिहिलं आहे की, 'ते माझ्या आईला सांगायचे की तिने त्यांना दिलेलं सगळ्यात चांगलं गिफ्ट मी आहे.' यावेळी ट्विंकल पुढे असं म्हणाली की, 'माझे वडील पहिली व्यक्ती होते ज्यांनी मला दारुचा पहिला घोट पाजला, त्यांनीच माझ्या हातामध्ये स्कॉचचा ग्लास दिला होता.'

    First published:

    Tags: Fathers day 2020, Rajesh khanna, Twinkle khanna